पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आता ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा वापर

१४ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियन टीम कल्याण मध्ये होणार दाखल

 कल्याण : दुषित पाणी,  पाण्याची गुणवत्ता  आणि  यामुळे  पसरणारे साथीचे आजार, कमी दाबाने  होणारा पाणी  पुरवठा अशा अनेक तक्रारीवर  तोडगा काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आता ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञानाचा अवलंब  करणार असल्याची  माहिती केडीएमसीचे स्थायी  समिती  सभापती दिपेश म्हात्रे यांनी शुक्रवारी पार  पडलेल्या स्थायी समिती सभेत दिली.

कल्याण डोंबिवली शहराचे नागरीकरणझपाट्याने वाढत आहे. पालिकेच्याअन्य सेवांबरोबरच पाणीपुरवठा यंत्रणेवरहीत्याचा ताण पडत आहे. महापालिकेत प्रतिदिनसरासरी २५० दशलक्षलिटर पाणीपुरवठा केलाजातो.  पालिकेची पाणीपुरवठा यंत्रणा कुचकामीठरल्यानेच आजही अनेक परिसरांत पाणीटंचाईव दूषित पाण्याची समस्या कायम आहे. यावरतोडगा काढण्यासाठी MS EVOQUA WATER TECHNOLOGIES, SYDNEY, AUSTRALIYA  या  ऑस्ट्रेलियन कंपनीला येत्या १४ फेब्रुवारी रोजी केडीएमसी मध्ये पाचारण केले आहे.  सदर कंपनी प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून     ON-LINE WATER QUALITY MONITORING SYSTEM FOR CITY DISTRIBUTORS NETWORK  या विषयासंदर्भात माहिती देणार आहे. या विषयीची माहिती  कंपनीचे  संचालक टोनी हिगसन हे देणार आहेत.  या  यंत्रणेच्या  माध्यमातून  केडीएमसी प्रशासनाला  ऑनलाईन  नागरिकांच्या  पाण्याच्या समस्येचे  निराकरण  करता येणे  शक्य होणार आहे.  यामध्ये पाण्याची गुणवत्ता, पाण्याचा कमीव जास्त दाबाने होणारा  पुरवठा  तसेच दूषितपाणी पुरवठा  कुठे होत आहे हे समजण्यासाठी प्रत्येक पाण्याच्या टाकीच्या शेवटी वायरलेस यंत्रणा  बसविण्यात  येणार आहे. आणि  १२तासांच्या  आत  समस्येचे  निराकरण  होणार आहे. पाण्यातील भौतिक,  रासायनिक  व जैविक घटकांची  असलेली मात्रा म्हणजेचपाण्याची गुणवत्ता होय. पाणी हे वैश्‍विक  द्रावक(UniversalSolvant) आहे. पाण्यातजास्तीत जास्त घटक सामावून, विरघळवून घेण्याची  क्षमता असते.                    ( श्रुती नानल-देशपांडे, प्रतिनिधी )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *