१२ रत्नांची माहिती देणारी केडीएमसीची दिनदर्शिका
महापौर, आयुक्तांच्या हस्ते झाले अनावरण
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची२०१९ या दिनदर्शिकेचे प्रकाशन महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके व अन्य पदाधिकारी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. कल्याण डोंबिवली परिसरात वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिष्ठित लोकांची माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे. यामध्ये, साहित्यिक. नाटककार, डॉक्टर अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील १२ नामवंत व्यक्तींचा यात समावेश करण्यात आला आहे.
या दिनदर्शिकेत भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळ जोशी, महान गायक प्रल्हाद शिंदे, प्रसिध्द किर्तनकार सावळाराम महाराज म्हात्रे, नाटककार शं.ना. नवरे, साहित्यिक पु. भा. भावे, कै. विनयकुमार सचान, अंदमान व निकोबार समुहाचे नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, वि.आ. बुवा, प्रसिध्द शिल्पकार भाऊ ऊर्फ सदाशिव साठे, लोकप्रिय युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे, भारताचार्य चिंतामणराव वैद्य आणि प्रसिध्द संगीतकार दशरथ पुजारी अशा व्यक्तींची व त्यांनी केलेल्या कामगिरीची संक्षिप्त माहिती दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर देण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात नावरुपास आलेल्या व्यक्तिंचा लेखाजोखा आजच्या पिढीस अवगत व्हावा, याउद्देशाने ही माहिती प्रसिध्द करयात आली आहे. श्रुती देशपांडे – नानल (प्रतिनिधी)