वाहतूक नियमांचे पालन करा, विद्याथ्यांनी दिला संदेश 

डोंबिवलीत शालेय बसच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली :  येथील जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्यावतीने वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त भव्य स्कुल व्हॅन रॅली निघाली होती. या रॅलीत 25 विद्यार्थी आणि 50 हून अधिक शालेय बस चालक-मालक आणि नागरिक सहभागी झाले होते. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश या रॅलीतून विदयाथ्र्यांनी दिला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे अध्यक्ष पांडुरंग हुमने, शिवसेनेचे नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख व जय मल्हार शालेय विद्यार्थी सामाजिक संस्थेचे प्रमुख मार्गदर्शक भाऊसाहेब चौधरी, संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांच्यासह आरटीओचे अधिकारी साळवी, डोंगरी वाहतूक शाखेच्या शिंदे, मानपाडा व टिळकनगर पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक   संस्थेच्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त निवासी विभागातील  महावितरण कार्यालयाजवळून या रॅलीला प्रारंभ झाला. आमचे शहर – सायलेंट शहर, हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम, हॉर्न न वाजविण्याचे फायदे, गोंगाट हे प्रदूषण आहे आणि प्रदूषण हा एकविसाव्या शतकातील अपराध आहे, हे पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती लक्षवेधी फलक हे रॅलीचे मुख्य आकर्षण होते.  या रॅलीत 25 विद्यार्थी आणि 50 हून अधिक चालक-मालक पुरुष व महिला चालक-मालक सहभागी झाले होते. यावेळी वाहतुकीचे नियमाचे पालन कसे करावे, हे सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातामध्ये फलक देऊन जन जागृती करण्यात आले. सीटबेल्ट लावणे, हेल्मेट घालून वाहन चालविणे, नागरिकांनी फूटपाथचा वापर करावा, तसेच गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये, ध्वनी प्रदूषण करू नये, असेही आवाहन करण्यात आले. संस्थेच्या निवासी विभागातील कार्यालयापासून निघालेली रॅली स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडने घरडा सर्कल येथे पोहोचली. तेथील कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारकाला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केल्यानंतर ही रॅली शेलार चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर टिळक चौकातील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली ताई पिंगळे चौकातून टिळक रोड-फडके रोड मार्गे इंदिरा चौकात आली. तेथिल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही रॅली मानपाडा रोडने शिवाजी उद्योग नगरातून पुन्हा कार्यालयाच्या ठिकाणी विसर्जित करण्यात आली. या रॅलीला विद्यार्थ्यांसह डोंबिवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  या कार्यक्रमा प्रसंगी रायगड भूषण शिवभूषण शिवशाहीर वैभव घरत यांचा मराठ मोळा व सहा फुलती गीतांचा शाहिरी कार्यक्रम पार पडला.  याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव, यांच्यासह   राजेश जयस्वाल, बाळू घरत, वैभव तुपे, लक्ष्मण फडतरे, दीपक वारंग, काशीराम साळवी, श्रीकांत चतुर, राजेंद्र धामणे, तानाजी आहेर, शरद पाटील, संतोष कदम, विनोद जयस्वाल, आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *