जन गण मन शाळेचा स्तुत्य उपक्रम ….डोंबिवलीच्या साहित्यनगरीत बालसंमेलन उत्साहात संपन्न !
डोंबिवली – येथील जनगणमन शाळेच्यावतीने विद्याथ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी बालसाहित्य संमेलनाचे आयेाजन करण्यात आलं होत. एकीकडे यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोव-यात सापडले असले तरी डोंबिवलीच्या साहित्य नगरीत बालसाहित्यीकांनी प्रथमच भरवलेले बालसाहित्य संमेलन यशस्वी करून दाखविले आहे. यावेळी ढोल ताशांच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली, या बालसाहित्य संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे जन गण मन शाळेची आठवीतील विद्यार्थीनी मिनिषा सावकरे या बालसाहित्य संमेलनाची अध्यक्ष होती .तर अनिकेत पांडे हा विद्यार्थी सचिव होता. काव्यवाचन, कथाकथन चर्चा इत्यादी साहित्य संमेलनाचे साम्य असणारे उपक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले. बालसाहित्य संमेलन यशस्वी झाल्याने सर्वांनीच बालकांचे कौतूक केल,
डोंबिवली येथील जन गण मन शाळेच्या वतीने आंतरशालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बालसाहित्य संमेलन शाळेच्या प्रांगणात आयोजित केले होते. या संमेलनात विविध भाषिक विद्यार्थ्यांनी सहभाग दिला होता. गुरुवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य नगरीत या संमेलनाचे उदघाटन झाले.सकाळी शाळेच्या प्रांगणातून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. ग्रंथ दिंडीत २० शाळांनी सहभाग दिला होता. सुमारे आठशे दिंडीकर यात सहभागी होते. ब्रहकुमारी शैक्षणिक विभागाचे अध्यक्ष सी के म्रुत्युंंजय, माउंट अबु ओमशांती मिडीयाचे संपादक, बी के गंगाधर, शिक्षक संघटनेचे जयवंत पाटील , संयोजक डॉ राजकुमार कोल्हे, प्रा.प्रेरणा कोल्हे, जेजम एफ.फाउंडेशनच्या अध्यक्ष जान्हवी कोल्हे.परशुराम भांगे, पुष्पा भांगे , गावदेवी शिक्षण मंडळाचे केशव भोईर , विविध शाळेचे विधार्थी, नागरिक ग्रंथ दिंडित सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली .विविध साहित्यिकांचे रुपे विद्यार्थ्यांनी दिंडित सादर केली. यामुळे उपस्थितांची करमणूक झाली.
—————————