एल्फिस्टन दुर्घटनेतच्या चौकशी अहवालात,  मुंबईकरांची क्रूर थट्टाच – संजय निरुपम 
 
मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेला मुसळधार पाऊस आणि अफवा याला दोषी ठरवत चौकशी समितीने रेल्व अधिका-यांना क्लीन चीट दिली आहे ही मुंबईकरांची क्रूर थट्टा आहे अशी टीका मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केलीय. एल्फिन्स्टन दुर्घटनेतील चेंगराचेंगरीत २३ मुंबईकरांनी जीव गमावला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती मात्र या समितीने आपला अहवाल रेल्वे प्रशासनाला सादर केला आहे.  या अहवालात त्यांनी मुसळधार पावसाला आणि “पूल पडला” या अफवेला दोषी ठरवलेले आहे. मात्र या दुर्दैवी घटनेला सरकार, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे अधिकारीच जबाबदार आहे असा आरोप निरूपम यांनी केलाय. समितीने चौकशी करणे हे फक्त नाटक होते. एल्फिस्टन स्थानकाच्या नवीन ब्रिजसाठी फंड मंजूर झाला होता. पैशाची काहीच कमतरता नव्हती, पण काम करण्याची सरकारची आणि रेल्वे प्रशासनाची मानसिकता आणि इच्छाशक्ती नव्हती. हा ब्रिज खूपच अरुंद आहे आणि प्रवाशांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. दोन ट्रेन एकाच वेळी आल्या की तिथे चेंगराचेंगरी होते.  मुंबईकरांकडून अनेक तक्रारी सुद्द्धा करण्यात आल्या होत्या. पण रेल्वे प्रशासनाने या तक्रारींकडे दुर्लक्षच केले.  रेल्वेच्या निष्काळजीपणामुळेचही दुर्देवी घटना  घडली आहे अशी नाराजी निरूपम यांनी व्यक्त केलीय. जो पर्यंत सर्व दोषींवर कारवाई होत नाही, त्यांना शिक्षा मिळत नाही तो पर्यंत जे २३ प्रवासी या घटनेत दगावलेले आहेत त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तसेच त्यांच्या परिवारानाही न्याय मिळणार नाही. दोषी रेल्वे अधिकारयांना क्लीन चिट देणाऱ्या या अहवालाचा मी तीव्र शब्दात निषेध करतो असेही निरूपम म्हणाले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *