आदिवासीच्या विकासाचे हजारो कोटी जातात कुठे ?
कर्जत ( राहुल देशमुख) : खालापूर तालूक्यतील नांवढे येथील १२ वर्षीय सूरेश वाघमारे याचा बुधवारी भूकबळीने मृत्यू झाला. त्यामुळे सुरेश हा व्यवस्थेचा बळी ठरलाय. ‘महिला बालविकासच्या लेखी अंगणवाडीत जात नाही, म्हणून कूपोषित नाही. असे लेखी महिला बालविकासच्या उपमूख्यकार्यकारी आधीकारी यांनी कळवले आहे. पण आदिवासींच्या विकासासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपये खर्च होतात. मग हा पैसा जातो कुठे ? असा प्रश्न सुरेश च्या मृत्यूने समोर आलंय. मात्र,व्यवस्थेचा दळभद्रीपणा म्हणा कि अमलबजावणीतील त्रुटी. या योजनांचा फायदा सर्व सामान्यांना किती होतो, हा आजही संशोधनाचाच विषय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कर्जत आणि खालापूर तालूक्याच्या मधोमध नांवढे गावाची कातकरी वाडी आहे या वाडीत राहणा-या सूरेश किशन वाघमारे या अवघ्या बारा वर्षाच्या मूलाचा बुधवारी मूत्यू झाला. दोन महिन्यापूर्वी दिवाळीचा फराळ वाटण्याच्या निमित्ताने नांवढे गावातील काही तरूणांनी, सामाजीक कार्यकर्त्यानी या वाडीत भेट दिली होती. त्यावेळी सूरेश आणि दूसरा एक आठ वर्षाचा मूलगा कूपोषित असल्याचे त्यांनी स्थानिक आरोग्य व बालकल्याण विभाग प्रशासनाच्या निर्दशनास आणून दिले होते. वृतमानपञात बातम्या झळकल्या, पण प्रत्येक विभागाने नेहमी प्रमाणे आपल्यावरची जबाबदारी झटकून टाकत त्या मुलाच्या पालकानांच जबाबदार धरले. आठ महिन्याच्या मूलांचा दोन महिन्यापूर्वीच मूत्यू झाला होता, आज सूरेशचा पण मूत्यू झाला. हंबरडा फोडून रडणारी सूरेशची आई वडील..त्याची दोन लहान भावंडे ढसा ढसा रडत होती. नांवढे वाडीला गहीवरून आले होते.