दिव्यांग विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तु व खाऊचे वाटप
डोंबिवली : जागतिक अपंग दिनानिमित्त डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडी येथिल पालिका शाळेमध्ये विविध शाळांतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तु व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थित अँड प्रदिप बावस्कर, अनिरूद्ध कुलकर्णी, राजू जांधे व विविध शाळांतील शिक्षकवर्ग यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.