‘सनातन पंचांग’ मोबाईल अॅपमध्येही उपलब्ध !
ठाणे – भारतभरामध्ये अनेकविध प्रकारच्या दिनदर्शिका आणि पंचांग यांची ‘अॅन्ड्रॉईड अॅप’ आणि ‘iOS अॅप’ उपलब्ध आहेत; मात्र सर्वसामान्य हिंदु समाजाला ‘पंचागा’च्या माध्यमातून धर्मशिक्षण कोठेही मिळत नाही. या उद्देशाने सनातन संस्थेने ‘सनातन पंचांग’ची निर्मिती केली. सनातन संस्था निर्मित ‘सनातन पंचांग’ गेल्या 13 वर्षांमध्ये घरोघरी पोहोचले आणि समाजाला घरबसल्या धर्मशिक्षण देण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच गेली 6 वर्षे हेच पंचांग हिंदु बांधवांच्या मोबाईलमध्ये ‘अॅप’च्या माध्यमातूनही पोहोचल्याने धर्मशिक्षण हवे त्या ठिकाणी उपलब्ध झाले आहे. ‘सनातन पंचांग 2019’ या ‘अॅप’मध्ये सर्वसामान्य हिंदूंना सण, उत्सव, व्रते आणि धार्मिक कृती करण्याच्या शास्त्रीय पद्धती, त्यांमागील कारणे अन् त्यांचे लाभ यांविषयी शास्त्रोक्त माहिती विस्ताराने दिली आहे.
‘सनातन पंचांग अॅप’ला वाढता प्रतिसाद बघता वर्ष 2019 चे मराठी आणि हिंदी भाषेतील ‘अॅन्ड्रॉईड अॅप’चे प्रकाशन नुकतेच करण्यात आले आहे. लवकरच ‘iOS अॅप’चे प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गेल्या 6 वर्षांत ‘सनातन पंचांग’ अॅन्ड्रॉईड अॅपचे 20 लाखहून अधिक, तर iOS अॅपचे गेल्या 2 वर्षांमध्ये 1 लाखहून अधिक डाऊनलोडस् आहेत. ‘सनातन पंचांग अॅप’ डाऊनलोड केलेल्या अनेक हिंदूंनी या अॅपमुळे खूप लाभ झाल्याचे अभिप्राय आम्हाला कळवले आहेत. या ‘अॅप’ची काही वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत. हिंदुत्वाचे सर्वांग असलेले हे अॅप प्रत्येक हिंदूच्या मोबाईलमध्ये असायलाच हवे.
* ‘सनातन पंचांग 2019 अॅप’ची वैशिष्ट्ये
अ. मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तमिळ आणि तेलगु या भाषांमध्ये उपलब्ध
आ. संत, राष्ट्रपुरुष आणि क्रांतिकारक यांचे स्मृतीदिन
इ. जत्रा, उत्सव आदी दिनविशेष, तिथी, पंचांग आणि मुहूर्त यांची माहिती
ई. सण-व्रते, धर्मशिक्षण, आयुर्वेद, उपचार पद्धती, अध्यात्म यांविषयी माहिती
उ. धर्मज्ञान देणार्या चलचित्रांविषयीचे (व्हिडिआचेे) सदर
ऊ. प्रतिदिनची तिथी, दिनविशेष, दिनांक आणि महिना हे लगेचच दिसण्याची सोय