मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस
मुंबई : मुंबईसह उपनगरात आणि राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. वीजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसानेअक्षरश: झोडपून काढलं.
मुंबईसह ठाणे रायगड पालघर या जिल्हयांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळत आहे. अंबरनाथमध्ये वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू आहे. मुलूंड ते भांडूप दरम्यानही मुसळधार पाऊस सुरु आहे. नेरूळ, नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. ठाण्यातही विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाने पावसाची रिमझिम सुरु आहे. शहराच्या अनेक भागात अंधार पसरलेला आहे. राज्यात मराठवाडा विदर्भ कोल्हापूर भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. कोकणातील रत्नागिरी, राजापूर, रांजा, रायगड या भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या 24 तासात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरु आहे. राजापूर, लांजा रत्नागिरी परिसरात जोरदार सरी कोसळत आहेत. दापोली, खेडमध्येही दमदार पाऊस सुरु आहे.मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. कुडाळ पावशी येथे बेलनदीवर पाणी आल्याने मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील नद्या पूरसदृश्य स्थितीत आहेत.