सेंट जोसेफ शाळा व्यवस्थापनाविरोधात पालक वर्गाचा एल्गार !
कर्जत ( राहुल देशमुख) : आयसीएसई बोर्डाची मान्यता असलेल्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत दर्जेदार शिक्षण मिळत नसल्याने शाळेविषयी अनेक पालकांच्या तक्रारी आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांना सांगूनही मुख्याध्यापक त्याकडे लक्ष देत नाहीत. तर पालकांना अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने या विरोधात सर्व पालक एकवटले आहेत. कर्जतमध्ये शनी मंदिर सभागृहात तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत मोठ्या प्रमाणात पालक उपस्थित होते .
यावेळी सेंट जोसेफ शिक्षक -पालक शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य संजय मोहिते म्हणाले कि ,शाळेचे मुख्याध्यापक पालकांना अपमानास्पद वागणूक देतात ,शिक्षक तक्रारी सोडवत नाहीत ,त्यामुळे आमच्याकडे ह्या तक्रारी येतात .मात्र आम्हालाही मुख्याध्यापक जुमानत नाहीत .आम्ही एव्हढी फी देऊनही शाळेत चांगले शिक्षक नाहीत ,त्यामुळे शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे , विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची असतांना सहलीला गेलेल्या पाल्यांबाबत मुख्याध्यापक यांनी पालकांना मेसेज केला कि ,जर सहली दरम्यान विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास ,ती आमची जबाबदारी नाही, त्यामुळे पालक वर्गात संताप निर्माण झाला आहे. महिन्याला १४ लाख जमा होत असताना शाळा चांगले शिक्षक देत नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत असल्याचे संजय मोहिते यांनी सांगितले .
पालकांमधून रेश्मा कुमावत म्हणाल्या कि ,पाल्याची शाळेत सुरक्षा नाही ,पार्किंग व्यवस्था नाही ,बस शाळेच्या आवारात येत नसल्याने बसमध्ये चढण्यासाठी विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावे लागते ,परिणामी कित्येक विद्यार्थी पडतात ,तर अपघाताची शक्यता असते .कम्प्युटर शिकण्यासाठी मासिक फी घेतात ,मात्र विद्यार्थ्यांना शिकवलेे जात नाहीत .दोन विद्यार्थ्यांना एक कम्प्युटर असणे गरजेचे असतांना शाळेत फक्त सात कम्प्युटर आहेत .हि आमची फसवणूक आहे ,अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या. .शुभांगी कडू म्हणाल्या कि ,मुले बसमध्ये चढताना पडतात ,व्यवस्थित शिकवत नाहीत ,शिक्षक टिकत नाहीत ,ते सतत बदलत असतात .सुवर्णा ढवळे यांनी पोर्शन न शिकविताच प्रश्न विचारले जातात ,प्रोजेक्ट बघितले जात नाहीत ,विद्यार्थ्यांना वार्षिक नियोजन देणे गरजेचे अशी सूचना मांडली .अविनाश सोनावणे यांचा मुलगा पडला असताना शाळेने त्याला दवाखान्यात नेले नाही ,मी संध्याकाळी आल्यावर सांगितले अशी तक्रार त्यानी सांगितली .शाळेतील शिक्षक ट्युशन लावा सांगतात , विद्यार्थ्याच्या शिक्षणाकडे शिक्षक लक्ष देत नाहीत ,तर मोहिते म्हणाल्या कि ,टीचर गैरहजर असतात ,चित्रकला ,कम्प्युटर ,खेळाचे स्वतंत्र शिक्षक नाहीत ,त्यामुळे विद्यार्थी मैदानी खेळात तरबेज कसे होणार ,असा प्रश्न उपस्थित केला .त्यातच बस वेळेवर येत नाहीत ,बस बंद पडतात ,एका बसमध्ये किती विद्यार्थी बसले पाहिजेत ,याकडे लक्ष देणे गरजेचे असून एका बसमध्ये १०० विद्यार्थी बसवतात ,अशी तक्रार अनेकांनी केली . प्रवीण गांगल यांनी शाळेच्या व्यवस्थापनावर अंकुश नसल्याने या गोष्टी घडतात ,यावर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार करण्याचे सांगितले . विद्यार्थ्याला शिक्षा करणे ,अक्षम्य गुन्हा आहे ,त्याचप्रमाणे अनेक विषयावर चर्चा केली .संतोष देशमुख यांनी शाळा प्रशासन पालक वर्ग व विद्यार्थी यांच्यातील समन्वय कशा प्रकारे असावे ,याबाबतीत मार्गदर्शन केले .यापुढे सर्वांच्या तक्रारींचे निवेदन शाळेला व जिल्हा परिषदेकडे पाठविणार असून भविष्यात शालेय व्यवस्थापनाने सुधारणा न केल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे मत शिक्षक -पालक संघटनेचे सदस्य व पत्रकार संजय मोहिते यांनी सांगितले .व्यासपीठावर प्रवीण गांगल ,संतोष देशमुख , बेडेकर , सोनी आदी उपस्थित होते .
**