ऍट्रोसिटी कायद्याविरुद्ध कितीही आंदोलने केली तरी त्यात बदल होणार नाही – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*
मुंबई – ऍट्रोसिटी विरोधकांची विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत.त्यांनी पुकारलेला आजचा भारत बंद अपयशी ठरला आहे. ऍट्रोसिटी विरोधकांनी या कायद्याविरुद्ध आंदोलने करू नयेत; त्यांनी कितीही आंदोलने केली तरी ऍट्रोसीटी कायद्यात कोणताही बदल होणार नाही असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला.
ऍट्रोसिटी कायद्याचा कोणीही कोणताही गैरवापर करू नये याची दक्षता सरकार जरूर घेईल याची ग्वाही आठवले यांनी दिली आहे. ऍट्रोसिटी कायदा हा संसदेत सर्व जाती धर्माच्या पक्षाच्या खासदारांनी एकत्र येऊन मंजूर केला आहे. देशात दलितांवर अत्याचार होतात. ते रोखण्यासाठी ऍट्रोसिटी कायदा आवश्यक आहे. ऍट्रोसिटी कायद्याची अंमलबजावणी सर्व राज्यात झाली पाहिजे. अट्रोसिटी कायदा हा दलितांचा कवचकुंडल आहे. त्यात बदल करण्याची किंवा रद्द करण्याची मागणी ही अन्यायकारक आहे. अट्रोसिटी कायद्याच्या विरोधात कोणीही आंदोलन करू नये. कोणी कितीही आंदोलने केली तरी ऍट्रोसिटी कायद्यात कोणताही बदल आम्ही होऊ देणार नाही असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला आहे.