कल्याणातील ‘ त्या ‘ बेघर कुटूंबियांना हवाय मदतीचा हात
झाड कोसळल्याने घर जमीनदोस्त
कल्याण : पश्चिमेतील उंबर्डे गावात राहणारे भारत जाधव याांच्या
घरावर चिंचेचे झाड कोसळल्याची घटना सोमवारी घडली.
सुदैवाने या दुर्घटनेतून जाधव कुटुंब बचावले. मात्र घर जमीनदोस्त
झाल्याने त्यांचे कुटुंबीय बेघर झाले आहेत. त्यामुळं बेघर झालेल्या जाधव कुटुंबियांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
उंबर्डे गावात राहणारे भारत जाधव हे हे पत्नी व तीन मुलांसह राहतात. आज सकाळच्या सुमारास त्यांच्या घराशेजारील पुरातन चिचेचे झाड अचानक त्यांच्या घरावर कोसळले. यावेळी ते दुकानावर गेले होते तर त्यांचा मोठा मुलगा सूरज हा कामावर गेला होता. त्यामुळे घरात त्यांची पत्नी गीता, मुलगी वृषाली व मुलगा रोशन हे तिघेजण हेाते. अचानक घरावर झाड कोसळल्याने या घटनेमुळे जाधव कुटूंबिय हादरून गेले. घरामध्ये आईसह दोघे मुले अडकून पडली होती, मोठा आवाज झाल्याने आरडाओरड एेकू आल्याने आजूबाजूचे लोक धावून आले. शेजा- यांनी व गावक- यांनी धाव घेऊन तिघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले. या तिघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र ज्या बाजूला झाड कोसळले त्याच भिंतीच्या शेजारी रोशन हा झोपला होता. झाड भिंतीवर पडल्याने ते अडले गेले त्यामुळे सुदैवाने रोशन बचावला. त्याच्या डोक्याला आणि कमरेला दुखापत झाली आहे. त्याला तातडीने पालिकेच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याच्या डोक्याचे सीटी स्कॅन करण्यात आले आहे अशी माहिती भारत जाधव यांनी दिली. भारत जाधव हे टेलरिंगचे काम करतात. घर कोसळल्याने घरातील संपूर्ण सामानाचाही नासधूस झाली आहे. त्यामुळे केवळ अंगावरील कपडेच उरले आहेत. त्यामुळे त्यांचे कुटूंब उघडयावर आले आहे. त्यामुळं शासनाकडून मदत मिळावी अशी त्यांची मागणी आहे.
—