आंबेनळी घाटात खासगी बस दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू : एक बचावला
पोलादपूर : पोलादपूरजवळील आंबेनळी घाटात एक खासगी बस २०० फूट दरीत कोसळून ३२ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. बसमधील प्रकाश सावंत-देसाई हे कोकण कृषी विद्यापीठाचे सहाय्यक अधीक्षक बचावले आहेत. देसाई यांनीच कोकण कृषी विद्यापीठामध्ये फोन करून अपघाताचं वृत्त दिलं.
बसमध्ये कोकण कृषी विद्यापीठाचे ३२ कर्मचारी आणि २ चालक-वाहक असे एकूण ३४ जण होते. महिन्याचा चौथा शनिवार आणि रविवार अशी सलग सुट्टी आल्याने कर्मचारी महाबळेश्वरला पिकनिकला निघाले होते. यासाठी त्यांनी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेतली होती. परंतु बस रायगडमधील पोलादपूर घाटात आल्यावर दरीत कोसळून हा अपघात झालाय.
बचावलेल्या कर्मचाऱ्यानं दिली अपघाताची माहिती
या अपघातातून प्रकाश सावंत-देसाई हे आश्चर्यकारकरित्या बचावले. बस अपघातावेळी प्रकाश सावंत यांनी उडी मारली. प्रकाश सावंत 500 फूट दरीतून कसेबसे वर आले. यानंतर त्यांनी सर्वात आधी या अपघाताची माहिती कृषी विद्यापीठाला कळवली. रस्त्यावरील निसरड्या मातीमुळे बस चालकाचं नियंत्रण सुटलं आणि बस दरीत कोसळली अशी माहिती त्यांनी दिली. या अपघातातील 31 मृतांची नावं समोर आलीत.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.
सुनील कदम
निलेश तांबे
सुयश बाळ
संदीप झगडे
प्रशांत भांबेड(ड्रायव्हर)
राजू रिसबूड
रत्नाकर पागडे
प्रमोद जाधव
संदीप सुर्वे
प्रमोद शिगवण
संदीप भोसले
जयंत चौगुले
राजू बंडबे
संतोष जळगांवकर
सुनील साठले
रवीकिरण साळवी
सचिन झगडे
संजीव झगडे
राजाराम गावडे
पंकज कदम
सचिन गिम्हवणेकर
रितेश जाधव
हेमंत सुर्वे
राजेश सावंत
रोशन तबीब
किशोर चौगुले
विकास शिंदे
संदीप सुवरे
सावंत(फोंडाघाट रिसर्च स्टेशन)