ठाणे, कल्याण परिसरात मुसळधार पाऊस 

डोंबिवली :    रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने कल्याण डोंबिवली मध्ये चांगलीच दाणादाण उडवली .कल्याण डोंबिवली शहरातील सखल भागात पाणी साचले तर कल्याण रेल्वे स्थानक,कल्याण कोर्ट,ओक बाग, अहिल्याबाई चौक,शिवाजी चौक ग्रामिन भागातील नांदीवली,आदीवली ,डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात,एम आय डी सी भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.

महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वनाथ राणे, मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत शहर संघटक मनोज राजे, दीपक शिंदे , केदार चाचे, सुशील पगारे , नगरसेवक रवी म्हात्रे यांनी डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली येथील परिसराची पाहणी केली . गेल्‍या २४ तासात सरासरी १०० मि.लि. इतक्‍या पावसाची नोंद झालेली आहे. महापालिका क्षेत्रात ४ वेगवेगळया ठिकाणी ड प्रभाग येथे – 3, ह प्रभाग परिसरात- 2, एम.आय.डी.सी .परिसरात-10 व आधारवाडी परिसरात- 7 झाडे कोलमडली.कल्याण डोंबिवलीत गेल्या २४ तासात ५३ मिमी ची नोंद झाली तर सकाळ पासून १६८ मिमी पाउस तर आजमितीला तब्बल १००३ मिमी पाउसाची नोंद झाली आहे  .कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक मंदावली होती तर कल्याण कोर्ट ,स्टेशन परिसर ,ओक बाग शिवाजी चौक ,आंबेडकर रोड ,अहिल्या बाई चौक ,आरटीओ मागील चाळी कोलशेवाडी बोगदा ,डोंबिवली रेल्वे स्टेशन परिसर ,एम आय दि सी परिसर ,ग्रामीण भागातील नांदिवली ,पिस्वली ,आडीवली ढोकली ,आजदे ,मिलाप नगर एसटी डेपो समोर सागर्ली आदी परिसरात पाणी साचल्याचे दिसून आले. .रस्त्यावर हि पाणी साचल्याने वाहतूकीचा वेग मंदावल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली .या पावसात कल्याण डोंबिवली परिसरातील २१ झाडे कोलमडली तर नांदिवली येथील आर्य गुरुकुल शाळेलगत असलेला महावितरण चा पोल सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कोलमडला या घटनेत या पोल वरील वीज वाहिनीचा शॉक लागल्याने मुस्कान राजोरीया हि १७ वर्षीय मुलगी किरकोळ जखमी झाली .सुदैवाने शाळा सुटण्यास तासाभराचा अवधी असताना हि घटना घडली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

मिलापनगर परिसर जलमय

मिलापनगर परिसरातील नाल्याचे भगदाड दुरुस्त न केल्याने वंदेमातरम उद्यान जवळील नाल्याचे पाणी मिलापनगर/सुदर्शननगर मध्ये शिरून काही भाग पुन्हा जलमय झाला. नाल्याच्या भिंतीला पडलेले भगदाडाचे फोटो व बातमी प्रसिद्धी माध्यमात येऊन तसेच येथील रहिवाशांनी पाठपुरावा करूनही एमआयडीसी/केडीएमसी/लोकप्रतिनिधी यांनी लक्ष दिले नाही. एमआयडीसीचे अभियंताना प्रत्यक्ष परिस्थिती दाखविली असता फक्त त्यांचाकडून आश्वासन मिळाल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. निवासी भागातील कावेरी चौकातील नाला व्यवस्थित साफ न केल्याने सुदर्शननगर उद्यान समोरील रस्त्यावर गुडघाभर पाणी आले आहे. एम्स हॉस्पिटल, मिलापनगर तलाव रोड, साईश्रुष्ठी सोसायटी, साईबाबा मंदिर रोड येथे पाणी साचले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *