प्लास्टीकला पर्याय मिळाल्याशिवाय दमडीही भरू नका
राज ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्लॅस्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांकडून आगामी निवडणुकीत फंड मिळावा म्हणून प्लॅस्टिकबंदी केली गेली नाही ना, अशी शंका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. जोपर्यंत महापालिका आणि राज्य सरकार स्वतःची कामं नीट करत नाहीत, तोपर्यंत कुणीही दंड देऊ नये, असं आवाहनही राज ठाकरेंनी केलं.

प्लॅस्टिकबंदीसारख्या मोठ्या निर्णयावर मुख्यमंत्री गप्प कसे, हा निर्णय सरकारचा आहे की फक्त विशिष्ट खात्याचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. प्लास्टिकबंदीचा निर्णय कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयासारखा आहे असेही राज ठाकरे म्हणाले. नागरिकांना कचरा टाकण्यासाठी कचरा कुंड्यांचीही व्यवस्था नाही. इतर अनधिकृत गोष्टींवर कारवाई करण्यासाठी का धजावत नाही? असाही सवाल त्यांनी उपस्थित केला,

कदमांनी नात्यावर भाष्य करू नये
प्लॅस्टिकबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे, मग आमच्या प्रश्नांना सरकारने उत्तर द्यावं, रामदास कदम यांनी नात्यांवर भाष्य करु नये, अशा शब्दात राज ठाकरे यांनी सुनावलं. काकांना पुतण्याची भीती कधीपासून वाटायला लागली? असा सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी राज ठाकरेंना उद्देशून विचारला होता. त्यावर राज ठाकरेंनी हे उत्तर दिलं,

महाराष्ट्र बँक बंद करण्याचा सरकारचा डाव
महाराष्ट्र बँकेचे अध्यक्ष रवींद्र मराठे यांच्या अटके प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत, सरकारला महाराष्ट्र बँक हळुहळू बंद करायची आहे असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. एवढ्या मोठ्या बँकेच्या अध्यक्षाला अटक होते आणि ती गोष्ट मुख्यमंत्र्यांना माहिती नाही हे शक्यच नाही, महाराष्ट्र बँकेला हळुहळू बंद करून बँक ऑफ बडोदामध्ये विलिन करण्याचा सरकारचा डाव असल्याची माहिती आहे. हे खरं असेल तर भयंकर आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा संचालक असलेल्या सहकारी बँकेत सर्वात जास्त नोटा बदलून दिल्या गेल्या हे स्पष्ट झाल्यावरही कारवाई होत नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *