गुगलच्या नेबर्ली  ऍपद्वारे करू शकतो शेजाऱ्यांना मदत

 मुंबईनंतर भारतातील इतर शहरांत देखील ऍप सुरु करण्याची गुगलची योजना

 मुंबई :- ( शंकर जाधव )   गुगलने नेक्स्ट बिनियन युझर्स टीमच्या नेबर्लीनावाच्या ऍपचे उदघाटन केले. लोकांना या ऍपमुळे शेजाऱ्यांकडून स्थानिक स्तरावरची महत्वाची माहिती मिळणार आहे. बीटा व्हर्जन असलेले नेबर्ली हे ऍप ऍन्ड्रॉईड ४.३ आणि त्याच्या वरच्या दर्जाच्या सर्व स्मार्टफोन मधील गुगल प्ले स्टोअर मधून आज डाऊनलोड करता येणार आहे. शेजाऱ्यांना ते जिथे राहतात तेथील अदययावत आणि अचूक माहिती असते. त्यामुळेच या ऍपद्वारे लोकांना स्थानिक प्रश्न विचारता यावेत आणि त्यांची उत्तरे सहज उपलब्ध व्हावीत या हेतुने या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. नेबर्ली लोकांना त्यांच्यातील ज्ञान इतरांसोबत वाटण्यास आणि शेजार सुरक्षित ठेवण्यास मदत करणार आहे.

गुगलच्या नेक्स्ट बिलीयन युझर्स टीमचे समूह उत्पादन व्यवस्थापक जोश वुडवर्ड यांनी सांगितले की, “वेबवरील माहिती द्वारे लोकांना एकमेकांसोबत जोडण्यासाठी गुगल सर्चची सुरुवात झाली. नेबर्लीच्या साहाय्याने हेच मिशन आम्ही वैश्विक स्तरावर नेत आहोत. यामुळे लोकांना वेबवरची माहिती मिळविणे सोपे आणि माहितीपूर्ण होईल. आम्ही केलेल्या सर्वेक्षणानुसार सर्वसामान्य व्यक्ती त्याचे आयुष्य त्याच्या घराच्या १ किलोमीटर परिसरातच जगतो. आपल्या शेजाऱ्यांकडून अंतर्गत सामूहिक ज्ञानाचे लाभ शेजाऱ्यांना मिळावेत हा नवीन अनुभव आम्हांला निर्माण करायचा होता. आणि जर तसं घडलं तर आम्हांला आशा आहे की खऱ्या अर्थाने शेजारधर्म निर्माण होईल आणि प्रत्येक ठिकाणी ‘नेबर्ली’ची भावना प्रत्येक ठिकाणी पहावयास मिळेल.”

नेबर्ली तीन मार्गाने युझर्सना मदत करते

  • शेजाऱ्यांना प्रश्न विचारा– प्रश्न विचारा, हा प्रश्न जो मदत करु शकेल अशा योग्य त्या तज्ज्ञ शेजाऱ्याकडे पाठविला जाईल.आपण शेजाऱ्यांशी बोलतो त्याप्रकारे युझर्स गुगलच्या व्हॉईस रिकग्निशनचा वापर करुन इंग्रजीसह आठ अन्य भारतीय भाषांमध्ये शेजाऱ्याला प्रश्न विचारु शकतो.
  •  स्थानिक तज्ज्ञ बना– उजवीकडे आणि डावीकडे प्रश्न स्वाईप करा आणि उत्तरे द्या. सर्वात जास्त मदत करणाऱ्या शेजाऱ्याला ऍप कडून बॅजेस बक्षिस म्हणून देण्यात येणार आहे.
  •    शेजारधर्म सुरक्षित ठेवा– कोणतीही खाजगी माहिती न देता ब्राऊज करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या. नेबर्ली वापरताना फोन नंबर, संपूर्ण नाव आणि इतर संपर्क माहिती गुप्त ठेवण्यात येते. नेबर्ली वापरणाऱ्या प्रत्येक सदस्याला शेजारधर्म सभ्यपणे पाळणे आणि मदतीसाठी तत्पर ठेवण्याचे ‘नेबर्ली प्रॉमिस’ अर्थात वचन द्यावे लागते.

  मुंबई बाहेरील व्यक्ती प्रतिक्षायादी मध्ये समाविष्ट होऊ शकतात आणि आपल्या शेजाऱ्यांना सुद्धा निमंत्रित करु शकतात. नेबर्ली वापरुन नवीन शेजारधर्म वाढवू इच्छिणाऱ्या व्यक्तींची टीमला गरज आहे.

गुगल विषयी थोडक्यात-

जगातील माहिती एकत्र आणून तिचा जगभर प्रसार करणे आणि मदत करणे हे गुगलचं ध्येय आहे. सर्च, मॅप्स, जीमेल, ऍन्ड्रॉईड, गुगल प्ले, क्रोम आणि युट्यूब सारख्या उत्पादनांच्या सहाय्याने करोडो लोकांच्या दैनंदिन आयुष्यात गुगल महत्वाची भूमिका निभावत आहे. जगातील एक सर्वत्र ओळखली जाणारी कंपनी म्हणून गुगलची एक वेगळी ओळख आहे. गुगल ही अल्फाबेट इनकॉर्पोरेटची उपकंपनी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क- मृणाल – ७०३९८ ३८०४६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!