कराटेपटू देवेश पाटीलला सैनात जाऊन करायची देशसेवा
डोंबिवली:- ( प्रतिनिधी ) : टीव्हीवर पाहिलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्यात भारतीय सैन्याने केलेल्या लक्षणीय कामगिरीचा ठसा बालमनावर उमटलेल्या कराटेपटू देवेश पाटील याने भारतीय सैन्यात भरती होण्याचा मानस व्यक्त केला आहे. देवेशला देशसेवा करण्याचा त्याचा मनोदय असून शालेय वयात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण, रौप्य व काश्य पदके पटकाविली आहेत. देवेश याने काॅरपोरेट ऐषोआरामी जीवनाकडे पाठ फिरवुन सैन्यात भरती होउन देशसेवा करण्याच्या उर्मीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
देवेश पाटील हा डोंबिवली येथील मानपाडा येथे राहतो. सध्या तो न्यु केंब्रिज स्कुल मध्ये शिकतो.गेल्या चार वर्षापासून शोटोकाँन कराटे इंडिया असोशिएशन या कराटे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत शिक्षण घेत आहे.विनोदकुमार वर्मा व देवधर दाभोलकर या प्रक्षिकाकडून कराटेचे अध्यावत प्रशिक्षण देवेश यास मिळत आहे. लहान वयातच देवेश याने चमकदार कामगिरी करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केली आहे. नेपाल, भुतान, श्रीलंका, मलेशिया यादेशात व दिल्ली ,पंजाब, येथे १२ सुवर्ण, ८ रौप्य ८ काश्य पदांचा मानकरी ठरला आहे. आरती इंडस्ट्रीने देवेशला वेळोवेळी मदत केल्याचे त्याचे वडील गुरुनाथ यांनी सांगितले. कराटेचे प्रशिक्षण घेण्यासाठी तून शाळेतून देवेशला प्रोत्साहन देण्याचे काम शिक्षक गणेश निकम करीत असतात. वडील गुरुनाथ पाटील आरती इंडस्ट्री त काम करतात तर आई गृहिणी आहे.
**