आयपीएस अधिकारी हिमांशू रॉय यांची आत्महत्या 
मुंबई:-आयपीएस अधिकारी आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू रॉय यांनी आत्महत्या केली आहे.  स्वत:ला गोळ्या झाडून त्यांनी आत्महत्या केली. गेल्या अनेक दिवसांपासून रॉय हे दुर्धर आजाराने त्रस्त होते. त्यामुळे ते दीड वर्षांपासून रजेवर होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंमाशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी, आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात बिंदू दारा सिंगला झालेली अटक, पत्रकार जे.डे. हत्याप्रकरण, लैला खान डबल मर्डर केस अशी अनेक गुंतागुतीची प्रकरणे सोडवण्यात त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता.
गेल्या दीड वर्षांपासून झालेल्या आजारामुळे ते वैफल्यग्रस्त झाले होते. त्यामधूनच शुक्रवारी दुपारी राहत्या घरी स्वत:ला गोळ्या झाडून घेतल्या. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना तात्काळ नेण्यात आले, मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. आता त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. हॉस्पिटलमध्ये नेले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!