बुलेट ट्रेनविरोधात मनसे आक्रमक, जागेची मोजणी बंद पाडली  !
कल्याण : बुलेट ट्रेन प्रकल्पाविरोधात मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं दिसून आलं.  शिळफाटा येथे  बुलेट ट्रेनसाठी सुरु असलेली जागेची मोजणी मनसेने बंद पाडली. यावेळी मनसे कार्यकर्त्याने जागेची मोजणीची मशीन फेकून दिली.
 काही दिवसांपूर्वी वसई येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुलेट ट्रेनला तीव्र विरोध दर्शवित स्थानिक शेतकऱ्यांनी जागा देऊन नये असे आवाहन वजा इशारा दिला होता. आज शीळ फाटा येथे जागेची मोजणी सुरु असताना पालघर जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोजणीची प्रक्रिया बंद पाडली. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही मनसे कार्यकर्ते आक्रमक होत. सरकारी अधिकाऱ्यांना अडथळा निर्माण करीत जागेची मोजणी बंद पाडली. यावेळी कार्यकर्त्यांनी जागेची मोजणी करण्याची मशीनच फेकून दिल्याने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. मनसे बुलेट ट्रेनची एक वीटही रचू देणार नाही असा इशारा जाधव यांनी दिला.
**

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!