पंकजा मुंडेंचा धंनजय मुंडेंना जोर का झटका ; राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांचा उमेदवारी अर्ज मागे !
मुंबई : राज्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांना जोर का झटका दिलाय. लातूर बीड उस्मानाबाद विधानपरिषद मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. कराड हे भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झाले होते.
येत्या २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू रमेश कराड यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. यावेळी  राष्ट्रवादीने लातूर बीड उस्मानाबाद विधानपरिषद मतदार संघा तून कराड यांना उमेदवारी दिली होती. येथून भाजपने सुरेश धस याना उमेदवारी दिलीय. अशोक जगदाळे यांनी राष्ट्रवादीचा डमी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे जगदाळे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार आहे. मात्र  कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने राष्ट्रवादीची नाचक्की झालीय.
उमेदवारी अर्ज मागे घेणे हा धक्का नसतो , धक्का तर निकालाच्या दिवशी असतो – धनंजय मुंडे
उमेदवारी अर्ज मागे घेणे हा धक्का नसतो , खरा  धक्का तर निकालाच्या दिवशी असतो अशा  शब्दात विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रमेश कराड यांनी घेतलेल्या माघारी संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केलीय. बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने  अशोक जगदाळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाहीर करून माझ्या दृष्टीने ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठचे आहे, आम्ही ती जिंकूच, मतांची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादी-काँग्रेस जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विधानभवनात पत्रकारांशी बोलतांना धनंजय मुंडे म्हणाले की,  रमेश कराडांना आम्ही पक्षात घेऊन अस काय झालं की त्यांनी माघार घेतली ? याच तेच उत्तर देऊ शकतील.माझ्या दृष्टीने आता ही निवडणूक जिंकणे प्रतिष्ठची आहे, आम्ही ती जिंकूच. मतांची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादी-काँग्रेस जिंकेल. स्वतःच उमेदवारी मागायची, स्वतःच अर्ज काढून घ्यायचा, पहिल्या दिवसापासून हे काही षडयंत्र होते का ? याबद्दल मी आताच बोलणार नाही. खरा धक्का निकालाच्या दिवशी असेल असे ही  धनंजय मुंडे म्हणाले. रमेश कराड यांना आम्ही राष्ट्रवादी काँगेस पक्षात घेतले, उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यावर  माणसावर निराशा येते त्यातून ते बोलत असावेत असे सांगतानाच जगदाळे यांना ताकदीने निवडून आणू, मतांच्या आकडेवारीने आम्हीच जिंकू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *