वणगा कुटुंबियानाच उमेदवारीचा निर्णय, उद्धव ठाकरेशीही झाले होते बोलणे.. : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई ; दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या कुटुंबियानाच पोटनिवडणुकीत उमेदवारी दयावी असा निर्णय पक्षाने घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याविषयी फोनवरही बोलणे झाले. वणवा कुटुबातील व्यक्ती लढत असेल तर शिवसेना उमेदवार देणार नाही असही त्यांनी स्पष्ट केलं होत. मात्र स्थानिक राजकारणातून त्यांच्यात गैरसमज पसरवले गेलेत असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
चिंतामण वणगा हे पक्षाचे वरिष्ठ नेते होते. पक्षाच्या वाढीत त्यांचा मोठा हात होता. संघर्ष करून त्यांनी पक्ष उभा केला
त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल पक्षाच्या खालपासून ते वरपर्यंत सर्वांच्या मनात सहानुभूती आहे. कुटुंबीय वागणार नाही ही आशा आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.
दोन दिवसांपूर्वीच वणगा कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर नाराजी व्यक्त करीत शिवसेनेत प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्यावेळी वणगा यांचे पुत्र श्रीनिवास यांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांनी भेटही दिली नसल्याचा आरोप केला होता. या आरोपाचे खंडन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, २८-२९ तारखेला त्यांच्या मुलाचा मला मेसेज आला होता. मला एकदा तुम्हाला भेटायचे आहे. तुम्ही आला होतात, पण त्यावेळी भेट झाली नाही. त्यावेळी पाचव्या मिनिटाला मी त्यांना उत्तर पाठवलं, तुम्ही भेटायला या. तसेच मी ऑफिसमध्येही सांगून ठेवलं होत की, त्यांना वेळ दया, आणि ३ तारखेला त्यांनी अचानक असा निर्णय घेतला. आम्हाला काहीच कल्पना नव्हती. वणगा कुटुंबीय उद्धवजीची भेट घेतली. हे टीव्हीवर पाहिल्यानंतर समजल असे मुख्य मंत्र्यांनी सांगितलं.
असे झाले उद्धवजीशी बोलणे
मागच्या महिन्यात मी स्वतः उद्धव ठाकरेशी फोनवर बोललो. आम्ही वणगा कुटुंबियानाच तिकीट देतोय, तुम्ही आम्हाला मदत करा असे त्यांना सांगितले. त्यावेळी उद्धवजी म्हणाले की, पोटनिवडणुक निवडणूक आम्ही लढवत नाही. मात्र आमचीही अशी भूमिका आहे की, ते कुटुंब लढत असेल तर त्यांना मदत केली पाहिजे. याचा निर्णय आम्ही लवकरच घेऊ, या संदर्भात सुभाष देसाई तुमच्याशी चर्चा करतील. त्यानंतर १ तारखेला माझी सुभाष देसाईशी चर्चा झाली. त्यांनीही हा चांगला निर्णय आहे. लवकरच निर्णय जाहीर करू असे म्हणाले असा सविस्तर खुळासाच मुख्यमंत्र्यांनी केला.
स्थानिक राजकारणाने त्यांचा गैरसमज केला
आमची लोक त्यांच्या संपर्कात होती, बैठकांची निमंत्रण त्यांना जात होती तरी सुद्धा त्यांच्या मनात गैरसमज कसा झाला याची कल्पना नाही. याचा आढावा घेतोय. मात्र माहिती घेतल्यानंतर अस कळाल की, स्थानिक राजकारणातील काही व्यक्तींनी त्यांचा गैरसमज करून दिला की, तुमचा विचारच होत नाही, त्यातून ही रिऍक्शन आली असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
—–