भाजपला झटका : वणगा कुटुंबीय शिवसेनेत !
मुंबई : भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कुटुंबियांनी भाजपला रामराम ठोकला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हा निर्णय जाहीर केला. वणगा कुटुंबीयांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपला हा मोठा झटका मानला जातोय.
पालघरचे माजी खासदार यांचे नुकतेच निधन झालं. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झालीय. वणगा यांचे पुत्र श्रीनिवास या जागेसाठी इच्छुक आहेत. मात्र भाजपकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी वणगा यांच्या पत्नी जयश्री आणि दोन्ही मुले श्रीनिवास आणि प्रफुल्ल यांनी पत्रकार परिषदेत पक्षाला सोडचिट्ठी देत असल्याचे जाहीर केले. गेली ३५ वर्ष वडिलांनी पक्षासाठी काम केलं. जेव्हा पक्षाला फक्त २ मतं पडायची तेव्हापासून वडील काम करत होते. वडिलांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याच्याकडे वेळ मागितली होती पण त्यांनी वेळही दिली नाही. भाजप पक्षाच्या नेत्यांनी आमच्यावर अन्याय केला. कुटुंबातील सदस्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप श्रीनिवास यांनी केला. आमचे शिवसेनेबरोबर नात असून, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी नेहमी सहकार्य केले आहे असे श्रीनिवास यांनी सांगितले. त्यामुळे वणगा कुटुंबियांच्या निर्णयानंतर भाजप काय भूमिका घेतेय याकडं लक्ष वेधलंय.
——