केडीएमसीच्या मलनिस्सारण टप्पा- २ च्या योजनसे राज्य शासनाची मंजुरी

मुंबई (संतोष गायकवाड) : कल्याण डोंबिवली शहर मलनिस्सारण टप्पा-2 च्या योजनेस बुधवारी राज्य शासनाने मंजुरी दिली. या योजनेची किंमत सुमारे १३२ कोटी ८२ लाख रूपये आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानाची अंमलबजावणी २०१५- १६ पासून राज्यात करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत पाणी पुरवठा मलनिस्सारण पर्जन्य जलवाहिनी नागरी परिवहन व हरीत क्षेत्र विकास इ पायाभूत सुविधांची निर्मिती शहरांमध्ये करण्यात येणार आहे. या अभियानातंर्गत २०१७-१८ मध्ये राज्याच्या ३२८० कोटी किंमतीच्या आराखडयास केंद्र शासनाने मान्यता दिलीय. या आराखडयात कल्याण डोंबिवली शहराच्या मलनिस्सारण प्रकल्प टप्पा २ चा समावेश आहे.

असा असेल सहभाग
केंद्राचा हिस्सा- ४४.२७ कोटी
राज्याचा हिस्सा- २२.१४ कोटी
केडीएमसीचा हिस्सा- ६६.४१ कोटी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *