अभिनव सहकारी बँकेची निवडणूक :  दादा आणि काकांची प्रतिष्ठा पणाला ! 
डोंबिवली (संतोष गायकवाड ) : राजकीय पक्षांच्या निवडणुकीप्रमाणेच रंगतदार ठरलेली अभिनव सहकारी बँकेच्या संचालक पदाची निवडणूक येत्या ६ मे रोजी होत आहे. माजी आमदार रमेशदादा पाटील आणि प्रसिध्द उद्योजक शंकरकाका भोईर यांचे पॅनेल आमनेसामने आहेत. त्यामुळे अतिशय चुरशीच्या निवडणुकीत दादा आणि काकांची  प्रतिष्ठा पणाला लागलीय. 
अभिनव सहकारी बँक ही ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात नावाजलेली बँक म्हणून ओळखली जाते.बँकेच्या एकूण १७ शाखा आहेत. २०१४ मध्ये पाच वर्षांसाठी निवडलेल्या १५ पैकी १० सदस्यांनी संचालकांनी राजीनामा दिल्याने बँकेची मुदतपूर्व निवडणूक होत आहे. माजी आमदार रामेशदादा पाटील प्रणित अभिनव पॅनल तर उद्योजक शंकर काका भोईर प्रणित श्री समर्थ पॅनल निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बँकेच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून १० संचालकांनी राजीनामा दिल्याचा आरोप श्री समर्थ पॅनलने केला असून, हाच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे. तर सहकार कायद्यातील तरतुदीनुसार १० संचालकांच्या बहुमताने अध्यक्ष बदलण्याचा अधिकार असतानाही राजीनामा देऊन मुदतपूर्व निवडणूक लादली असून, या मागे स्वार्थी विचार असल्याचा आरोप अभिनव पॅनेलने केला आहे, हाच त्यांच्या प्रचाराचा मुद्दा आहे.  दोन्ही पॅनलने पत्रकबाजीच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करण्यास सुरुवात केलीय. राजकीय पक्षांच्या निवडणुकीप्रमाणेच दोन्ही पॅनेलने शहरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केलीय.  राजकारणातील एकमेकांचे प्रतिस्पर्धी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आमने- सामने आले आहेत. त्यामुळे अभिनव बँकेच्या निवडणूक चांगलीच रंगतदार बनलीय. त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत दादा कि काका, कोण बाजी मारणार याकडंच डोंबिवलीकरांचे  लक्ष वेधलय.
—-
हे आहेत श्री समर्थ पॅनलचे उमेदवार
हे आहेत अभिनव पॅनलचे उमेदवार 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!