आसाराम बापूना शिक्षा उल्हासनगरात पेढे वाटले
उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जोधपूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उल्हासनगर येथील नागरीकांनी या शिक्षेचे स्वागत केले . कायद्याने वागा या सामाजिक संघटनेने उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळ पेढे वाटून आनंद साजरा केला .
कायद्याने वागा संघटनेचे राज असरोंडकर, किरण सोनवणे, संजय वाघमारे , कल्पेश माने , प्रदीप गोडसे, प्रफुल केदारे , रुपेश इंदुलकर, प्रशांत राजगुरु, संजय राजगुरु व अन्य कार्यकर्त्यांनी रेल्वे स्थानकजवळील परिसरात नागरिकांना आसाराम बापूला शिक्षा झाल्याचे जाहीर झाल्यानंतर पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला .
या संदर्भात राज असरोंडकर म्हणाले की या देशात देवाधर्माच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना काही तथाकथित संत, महात्मे लुबाडीत असतात. यात मोठ्या प्रमाणात महिलांचे आर्थिक व लैंगिक शोषण देखील होत असते . अशा कथित संत आसाराम बापूच्या विरुद्ध महिलांनी लढा दिला . शेवटी न्यायालयाने देखील त्यांच्या बाजूने निर्णय दिला. यामुळे आमचा देशाच्या संविधान व न्याय संस्थेवरील विश्वास आणखी दृढ झाला असून आम्ही आमचा आनंद पेढे वाटून व्यक्त करीत आहोत .
काय आहे प्रकरण :
२०१३ मध्ये शाहजहांपूरच्या १६ वर्षांच्या मुलीने आसाराम याच्यावर जोधपूर आश्रममध्ये बलात्काराचा आरोप केला होता. तेव्हापासून आसाराम हे जेलमध्ये आहे. आसाराम यांच्यासह पाचही आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे. आसाराम याच्यासह इतर चारही आरोपी शिवा, शरतचंद्र, शिल्पी आणि प्रकाश यांना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.