नव्या फॅसिझमच्या विरोधात एक व्हा ! : भाकपचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांची भाजप सरकारवर प्रखर टीका 
डोंबिवली ( शंकर जाधव ) : बलात्कार होत असतील ते कुठल्याही प्रांतात होत असो, आणि बलात्काराला वाचविण्यासाठी जर कोणी तिरंगा घेऊन जात असेल तर त्यांच्या विरोधात आपण सगळ्यांनी लढा दिला पाहिजे. हा फॅसिझम नव्या स्वरूपाचा येत आहे. या फॅसिझम विरोधात आणि एक झालं पाहिजे असे आवाहन भाकपचे ज्येष्ठ नेते प्रकाश रेड्डी यांनी केलं. एकीकडे डॉ नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश  यांचे मारेकरी अजूनही पोलिसांना सापडत नाहीत तर दुसरीकडे असिमानंद, प्रज्ञा ठाकूर, पुरोहित यांना सोडले जाते. मुख्यमंत्री `क्लिन चिट`देतात असा  आरोपही यावेळी रेड्डी यांनी करून  भाजप सरकारवर टीका केली. काॅम्रेट शहिद भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने डोंबिवलीत लोढा हेवन येथे रशियन क्रांतिकारक लेनिन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या संयुक्त जयंतीचा उत्सव आयोजित करण्यात आला होता. त्या जाहीर सभेत  रेड्डी बोलत होते.
प्रकाश रेड्डी यांनी देशातील व राज्यातील बिघडत चाललेल्या सामाजिक व राजकीय परिस्थिती बाबत भाजप सरकारला धारेवर धरत प्रखर टीका केली.  छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली.आज शेतकरी आत्महत्या करीत आहे. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना अभय दिले. परस्त्रीचा सम्मान केला.पण आज देशात स्त्रियावर अत्याचाराच्या बातम्या वाचून मान शरमेने खाली जाते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराप्रमाणे शहरातील जमिनीचे राष्ट्रीयकरण झाले असते तर कुणा बिल्डरची मक्तेदारी दिसली नसती. बाबासाहेबांच्या घटनेचा गळा घोटण्याचे काम हे सरकार करीत आहे अशी टीका रेड्डी यांनी केली. यावेळी लाल बावटा रिक्ष युनियनचे अध्यक्ष व भाकपचे स्थानिक नेते काळू कोमास्कर यांनीही सरकारच्या धोरणाविरोधात टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *