ठाकुर्ली येथील पूर्व -पश्चिम जोडणारा उड्डाणपूल मे महिन्यात खुला होणार ;    कल्याण लोकसभा खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण –  – ठाकुर्ली येथील पूर्व – पश्चिम भागाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून सदरचा उड्डाणपूलाचे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकार्पण होणार असून लगेचच  नागरिकांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे. तत्पूर्वी उड्डाणपुलालगत रेल्वे हद्दीत असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी यासाठी कल्याण खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाकडे वेळोवेळो पाठपुरावा केला होता. मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी येत्या १० दिवसात सदर रस्त्यांची दुरुस्ती रेल्वे प्रशासनाकडून केली जाईल असे आश्वासन   खा.डॉ. शिंदे यांना दिले आहे. सुमारे २५ कोटी रुपये खर्चून बांधल्या गेलेल्या उड्डाणपुलाचे काम ऑक्टोबर २०१६ मध्य सुरू झाले होते. खा.डॉ.शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याने उड्डाणपुलाचे काम जलदगतीने पूर्ण झाले आहे. खा.शिंदे यांनी उड्डाणपुलाचे काम सुरू असताना अनेकवेळा पाहणी दौरे केले होते. उड्डाणपुलाचे सुरू असताना उड्डाणपुलाला लागूनच असणारे रेल्वेच्या हद्दीतील रस्ते  होणे देखील गरजेचे होते. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडे खा.डॉ.शिंदे यांचा सतत पाठपुरावाही सुरू होता. येत्या १० दिवसामध्ये सदर रस्त्यांची दुरुस्ती  व रुंदीकरण करण्याची कामे पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापकांनी खा. डॉ. शिंदे यांना दिले आहे. हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यावर ठाकूर्ली रेल्वे फाटक बंद होणार असून त्यामुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. तसेच फाटकामुळे होणारे अपघातही टळणार असून नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या वाहतूक कोंडीतूनही दिला मिळेल असा विश्वास खा.डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.

One thought on “ठाकुर्ली येथील पूर्व -पश्चिम जोडणारा उड्डाणपूल मे महिन्यात खुला होणार ;   कल्याण लोकसभा खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश”
  1. Thanks shrikant saheb. तसा मी राजकारण आणि राजकारणी पासुन दुरच राहतो. मी बालपणा पासून वयाच्या 29 वर्षे ठाण्यात राहीलो. एकनाथ जी साहेब यांच्या राजकारणाची सुरवात मी जवळून बघितली आहे. असेच काम करत रहा. आमच्या सदिच्छा आहेत..
    आपला.
    मो.के. सावंत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!