डोंबिवलीकरांचा ” बिर्याणी महोत्सवाला ” उदंड प्रतिसाद
डोंबिवली- डोंबिवलीतील स.वा.जोशी विद्यालयाच्या पटांगणात सुरू असलेल्या डोंबिवलीतील पहिल्या बिर्याणी महोत्सवाला डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे.
स्वराज्य इव्हेंट्स आणि अविष्कार ग्रुपतर्फे डोंबिवलीमध्ये हा बिर्याणी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी तीन हजारांहून अधिक डोंबिवलीकरांनी महोत्सवाला भेट देऊन येथील खमंग बिर्याणी चा आस्वाद घेतला महोत्सवात २२ स्टॉल असून येथे ४० पेक्षा जास्त प्रकारच्या बिर्याणी येथे उपलब्ध आहेत. रविवार १५ एप्रिलपर्यंत संध्याकाळी ५ ते रात्रो १० पर्यंत बिर्याणी महोत्सव सुरू राहणार आहे. खास कोल्हापुरहून आलेली बांबू व मटका बिर्याणी खायला खवय्यांची चांगलीच गर्दी उडाली आहे. बिर्याणी बांबूमध्ये ठेऊन चुलीवर भाजून ती तयार केली जाते .तुम्हाला फिश आवडत असेल तर, फिशिलिक्सच्या काऊंटरवर फिश चिली, टुना फिश बिर्याणी, आणि चविष्ठ बासा फेरी फेरी ह्या पदार्थाचा डोंबिवलीकरांकडून मनमुराद आस्वाद घेतला जात आहे. याबरोबरच मराठमोळ्या अन्नपूर्णा येथे मिक्स कडधान्य असलेली व्हेज बिर्याणी शाकाहारी खाणाऱ्यांची आकर्षण ठरत आहे. तसेच कोकणी गोवन, मालवणी मसाल्यातील दम बिर्याणील चांगली पसंती मिळत आहे. अशीच गर्दी भातुकलीच्या काऊंटरवरील कोकोनट चिकन बिर्याणीला दिसून येत आहे. शाकाहारींसाठी येथे मश्रूम व्हेज बिर्याणी उपलब्ध आहे. बिर्याणी महोत्सवात इस्माइली चे चिकन माया रोल, हुंगामा कबाब, थ्री चिल्लेर्स चे मूग पहाडी कबाब , व्हेज बिर्याणी पाहावयास मिळते. चुलीवर केलेली बिर्याणी, पनीर चीज रॉकेट तर दिल्ली दरबारच्या स्टॉलवर मटण, चिकन व अंडे यांचे मिश्रण असलेली झम झम बिर्याणी खवय्यांची पसंतील उतरली आहे.डोंबिवली मध्ये पहिल्यांदाच बिर्याणी महोत्सव होत असून येथे खाऊ गल्ली बरोबरच गाण्याचे , काव्यवाचनाचे, मुशायरचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक स्वराज समर्थ व समीर चिटणीस यानी दिली.