ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंगवर टेम्पोची रेल्वेच्या गेटला धडक
डोंबिवली : आज सकाळी सव्वा आठच्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंगजवळ एका टेम्पोने रेल्वे गेटलाच धडक दिली. गेट बंद होत असतानाच टेम्पो चालकाचा अंदाज चुकल्यानेच हा अपघात घडलाय. या धडकेमुळे लोखंडी गेट पूर्णपणे वाकलाय.
डोंबिवलीहून कल्याणला जाण्यासाठी शॉर्टकटचा मार्ग म्हणून वाहनचालक ठाकुर्ली रेल्वे क्रॉसिंगचा वापर करतात. त्यामुळे रेल्वे गेट जवळ वाहन चालकांची नेहमीच मोठी गर्दी होत असते. गेट उघडल्यानंतर घाईघाईने वाहन पार करण्याची वाहनचालकांची जणू काय स्पर्धाच लागते. एखाद्यावेळी वाहनांची एकमेकांना धडक बसून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. संध्याकाळी वाहनांच्या गर्दीमुळे चोळेगावातील रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. त्याचा फटकाही वाहन चालकांना व नागरिकांना सहन करावा लागतो. रेल्वे गेटजवळ आरपीएफ हे २४ तास उभे असतात.. मात्र आजचा अपघात हा एकमेकांचा अंदाज चुकल्याने घडलाय असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. संध्याकाळच्यावेळी बाहेरील रस्त्यावर वाहनांची खूपच गर्दी होत असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होते. मात्र रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकही वाहतूक पोलीस नसतो. अश्यावेळी स्थानिक नागरिकच वाहतूक कोंडी सोडविण्यासााठी पुढाकार घेताना दिसतात. या ठिकाणी पोलीस चौकीही आहे. मात्र संध्याकाळच्यावेळी चौकीत पोलीस नसतात. सध्या रेल्वे पादचारी पुलाचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. जो पर्यंत पुल सुरू होत नाही. तोपर्यंत रेल्वे गेट बंद होणार नाही.
धडक बसलेला हाच तो टेम्पो
Very good reporting Santosh