ग्रामीण महाराष्ट्रात कमळ फुललं
मुंबई : राज्यातील 16 जिल्ह्यातील 3 हजार 131 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. जवळपास सर्वच ग्रामपंचायतीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर 2974 ग्रामपंचायत पैकी 1,457 ग्रामपंचायतीवर भाजपाचे सरपंच निवडून आले.त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रात कमळ फुललं.
ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच जनतेतून थेट सरपंच निवडयात आला. त्याचा फायदा भाजपला झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदाच्या फॉर्म्युल्याचा फायदा भाजपला झाला होता त्यामुळे फडणवीस सरकारने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता त्याचा फायदा भाजपला झाल्याचे स्पष्ट झालयं. ग्रामीण भागावर काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व होत पण भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित केल. त्यामुळे फडणवीसांच्या नेतृत्वावर पून्हा एकदा शिक्कामोर्तब झालय.