मुंबई महानगरपालिका ८ प्रभाग समिती अध्यक्ष बिनविरोध
मुंबई : महानगर पालिकेच्या १७ प्रभाग समित्यांपैकी ८ प्रभाग समितीच्या निवडणुका आज पार पडल्या. आठही प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर आण उप महापौर श्रीमती हेमांगी वरळीकर यांनी कामकाज पाहिले.
जी/उत्तर’ प्रभाग समिती अध्यक्षपदी़ – मरिअम्माल मुथुरामलिंगाम थेवर ( शिवसेना)
‘एच/पूर्व आणि एच/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी- सदानंद परब (शिवसेना)
‘के/पूर्व’ प्रभाग समिती अध्यक्षपदी- सुनिल यादव (भाजप)
‘के/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी – योगीराज दाभाडकर (भाजप)
‘एल’ प्रभाग समिती अध्यक्षपदी- किरण ज्योतीराम लांडगे (शिवसेना पुरस्कृत अपक्ष नगरसेवक)
‘एम/पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी- राजेश ओमप्रकाश फुलवारीया (भाजप)
‘एन’ प्रभाग समिती अध्यक्षपदी- रुपाली सुरेश आवळे (शिवसेना)
‘एस’ आणि ‘टी’ प्रभाग समिती अध्यक्षपदी- सारिका मंगेश पवार (भाजप)
उर्वरित ‘एम/पूर्व’ प्रभाग समितीची निवडणूक शुक्रवार, दिनांक १९ एप्रिल, २०१८ रोजी सकाळी ११ वाजता होणार असून पीठासीन अधिकारी म्हणून उप महापौर हेमांगी वरळीकर या उपस्थित राहणार आहेत.