मुंबई,  ठाणे,  नवी मुंबई,  कल्याण-डोंबिवली,  भिवंडी या महापालिकांसह एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे यांना  सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदेचे निर्देश 
मुंबई : मुंब्रा बायपास रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १६ एप्रिलपासून सुरू होणार असून त्यासाठी एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नॅशनल हायवे तसेच, ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई आदी महापालिकांनी त्यांच्या अखत्यारितील सर्व रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी दिले.
शिळफाटा, मुंब्रा बायपास रस्त्यांची दुरुस्ती व रुंदीकरणाच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचे योग्य व्यवस्थापन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन शिंदे यांच्या मंत्रालयीन दालनात करण्यात आले होते. यावेळी एमएमआरडीएचे मुख्य अभियंता राजेंद्र घाडगे, सार्वजनिक बांधकाम अवर सचिव प्रवीण पाटील, ठाणे कार्यकारी अभियंता गांगुर्डे, ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, ठाणे पोलिस उपायुक्त अतुल काळे, नवी मुंबई पोलिस उपायुक्त नितीन पवार, ठाणे ग्रामीण वरिष्ठ पोलिस निरीक्षक कसबे आदी अधिकारी उपस्थित होते.
जेएनपीटीमधून सोडण्यात येणाऱ्या कंटेनरमुळे वाह​तु​कीवर येणारा प्रचंड ताण टाळण्यासाठी ही वाहतूक दुरुस्तीच्या कालावधीत केवळ रात्रीच्या वेळी सुरू ठेवण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच दिवसा थांबविण्यात येणाऱ्या या वाहनांच्या पार्किंगसाठी नवी मुंबईतील सिडको तसेच मनपाच्या ट्रक टर्मिनलच्या रिक्त जागा तात्पुरत्या वापरासाठी देण्याची  शिंदे यांची सूचना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी मान्य के​ली​.
आयजीपीएल कंपनी ते खोणी सर्कल हा तळोजा एमआयडीसीतून जाणारा रास्ता, चक्कीनाका ते नेवाळी फाटा हा श्रीमलंगगड रस्ता तसेच, गोविंदवाडी बायपास आदी कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
बायपास दुरुस्तीचे काम जवळपास दोन महिने चालणार असून त्यासाठी जेएनपीटी, नवी मुंबई, ठाणे येथील प्रशासकीय व पोलिस अधिकाऱ्यांनी वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी लवकरच एकत्रितपणे बैठक घेऊन त्यानुसार वाहतुकीच्या नियोज​नाची आगाऊ प्रसिद्धी वाहनचालकांसाठी करावी,असेही शिंदे यांनी सांगितले.
One thought on “मुंब्रा बायपास दुरूस्तीमुळे होणारी वाह​तूक कोंडी टाळण्यासाठी, सर्व रस्त्यांची युद्धपातळीवर डागडुजी करा !  एकनाथ शिंदेचे निर्देश ”
  1. Ya saglya lokana tikdun normal gaditun mhnje without red li8 car madhun ….Jaun yeun dakhva traffic chy velela mag samjel tras kay asto te … Tumhala VIP treatment ahe …Lokana nahi jyanchya paishyvar he sagle kharch hotat … Kopri pool lavkar bandha lokana nahak tras sahan karava lagto sakal sandhyakal…Jo Tumhala hot nahi VIP gaditun firtana

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *