मुंबई महापालिकेच्या शिरपेचात मनाचा तुरा : देशपातळीवर पाणीपुरवठा  कार्याचा गौरव,  तीन पुरस्काराची ठरली मानकरी !
मुंबई /संतोष गायकवाड : आशिया खंडातील सर्वात मोठी महापालिका ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेला देशपातळीवर गौरविण्यात आलंय. महापालिकेच्या पाणी पुरवठा विषयक प्रकल्पाने राष्ट्रीय पातळीवर तीन पुरस्कार पटकावले. युनेस्को‘ व केंद्र सरकारच्या सहकार्याने वॉटर डायजेस्ट‘ द्वारे दिल्लीत आयोजित पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय जलसंसाधन मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.  या पुरस्काराने महापालिकेच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला गेलाय.
महापालिकेकडून दररोज  दीड कोटींपेक्षा अधिक नागरिकांना दररोज ३८० कोटी लीटर पिण्याचा पाण्याचा सक्षमपणे व नियमितपणे  पुरवठा केला जातो. वेगवेगळ्या गटातील तीन पुरस्कार पटकावीत महापालिकेने राष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविलाय. हे पुरस्कार महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प)  डॉसंजय मुखर्जी,  उपायुक्त (विशेष अभियांत्रिकी रमेश बांबळे यांनी हे पुरस्कार पाणी पुरवठा प्रकल्प खात्याचे कार्यकारी अभियंता  सुधाकर हांडेसंबंधित सहाय्यक अभियंता राजेंद्र खानविलकर व यतिश रांदेरिया यांनी स्वीकारले
 
अशी झाली निवड 
 वॉटर डायजेस्ट‘ पुरस्कारांसाठी देशभरातील पाणीपुरवठा प्रकल्पांचा विचार करण्यात येऊन पाणी पुरवठा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सात सदस्यांच्या परिक्षक मंडळाद्वारे पुरस्कार विजेत्यांची निवड करण्यात आलीया परिक्षक मंडळात निरी, आय.आय.टी, टेरी,  खाजगी क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आय. आय. टी.,  केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

हे आहेत तीन पुरस्कार ..

बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट‘ 

याबाबत माहिती देताना उपायुक्त रमेश बांबळे यांनी सांगीतले की, ‘बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर पायोनियर प्रोजेक्ट‘ या गटात सर्वेात्कृष्ट कार्याचा पुरस्कार हा बृहन्मुंबई महापालिकेच्या गुंदवली ते भांडूप संकुल दरम्यानच्या जलबोगद्यासाठी देण्यात आला आहेभिवंडी तालुक्यातील गुंदवली पासून सुरु होणारा हा जलबोगदा कापूरबावडीमार्गे भांडूप संकुलापर्यंत पाण्याचे वहन करण्यासाठी बांधण्यात आला.१५.१० किमी लांबीचा.२५ मीटर व्यासाचा हा जलबोगदा जमिनीखाली १२० मीटरवर असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे ६ वर्षात बांधण्यात आला आहेमुंबईकरांची भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेऊन उभारणी करण्यात आलेल्या या जलबोगद्याचे लोकार्पण १ डिसेंबर २०१६ रोजी करण्यात आलीय.

वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर‘ 

दुसरा पुरस्कार हा वॉटर रियुज प्रोजेक्ट ऑफ द इयर‘ या गटातील असून हा ठाणे जिल्ह्यातील पांजरापूर येथे बृहन्मुंबई महापालिकेने उभारलेल्या पाणी पुनर्वापर प्रकल्पासाठी देण्यात आला आहेभातसा धरणातून मुंबईला दररोज २२० कोटी लीटर (2200 MLD) पाण्याचा पुरवठा होतोया पाण्यावर पांजरापूर येथील जल प्रक्रिया केंद्रात प्रक्रिया केली जातेया प्रकियेदरम्यान दररोज साधारणपणे ४.५ ते ६ कोटी (45 to 60 MLD) लीटर एवढे पाणी (Waste-water) बाहेर टाकले जात असेयाच पाण्यावर पुन्हा प्रक्रिया करुन ते पाणी परत वापरण्यायोग्य करण्यासाठी प्रकल्प उभारल्याने या वाया जाणाया पाण्याचाही वापर करणे शक्य झाले आहेयाच प्रकल्पाची नोंद या पुरस्काराच्या निमित्ताने घेण्यात आलीय.

बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट

तर तिसरा पुरस्कार हा बेस्ट वॉटर ट्रिटमेंट प्रोजेक्ट‘ या गटात भांडूप येथील ९० कोटी (900 MLD) लीटर क्षमतेच्या जल प्रक्रिया केंद्राला देण्यात आलाया जलप्रक्रिया केंदात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे जल शुद्धीकरण केले जातेतसेच प्रक्रिया केंद्रातून बाहेर टाकले जाणारे पाणी देखील पुन्हापुन्हा प्रक्रिया करुन पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोयानुसार वॉटर डायजेस्टच्या तीन राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांच्या माध्यमातून महापालिकेच्या पाणी पुरवठा विषयक कार्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आलाय. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *