फडणवीसांची आज परीक्षा : जनतेतून थेट सरपंच निवडीचा निकाल
मुंबई : राज्यातील १६ जिल्हयांतील ३ हजार १३१ ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे जनतेतून पहिल्यांदाच सरपंच निवडला जाणार आहे. सरंपच थेट निवडण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यामुळे फडणवीस सरकारचीही परीक्षा ठरणार आहे.
8 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात नाशिक, धुळे, जळगाव, नंदूरबार, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, जालना, लातूर, हिंगोली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्य़ांमधील एकूण 3131 जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं. यावेळी सरासरी 79 टक्के मतदान पार पडलं. त्याची मतमोजणी सेामवारी होणार आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत कोण बाजी मारतो याकडे राज्याचे लक्ष वेधले आहे.
१६ ऑक्टोबरला दुसरा टप्पा
दरम्यान, पहिल्या टप्प्याचा निकाल लागल्यावर येत्या १६ ऑक्टोबरला दुसऱ्या टप्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यातही 18 जिल्ह्यांतील सुमारे 4 हजार 119 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसह रिंगणात आहेत.
ग्रामपंचायतीच्या जागा
जिल्हा जागा
नाशिक 150 , धुळे 96,  जळगाव 101 , नंदुरबार 42,  अहमदनगर 194,  औरंगाबाद 196 , बीड 655 ,  नांदेड 142 ,  परभणी 126 ,  जालना 221,  लातूर 324
हिंगोली 46,  अकोला 247,  यवतमाळ 80,  वाशिम 254 बुलडाणा 257

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!