डोंबिवलीत मनसेचा शेतकऱ्यांना मदतीचा हात …

गरीबाचा वाडा येथे शेतकरी आठवडा बाजार …

डोंबिवली :- ( शंकर जाधव ) राज्यात शेतकऱ्यांची परीस्थिती सुधारावी हा उद्देश समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मदतीचा हात पुढे केलाय. डोंबिवली पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथे मनसे विभाग अध्यक्ष विजय शिंदे यांच्या प्रयत्नाने शेतकरी ते ग्राहक असा आठवडा बाजार सुरु झाला आहे. दर मंगळवारी या बाजाराला डोंबिवलीकरांकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पुणे येथील भीमाशंकर शेतकरी गट येथे भाजीपाला विकण्यासाठी येत असून या शेतकऱ्यांनी मनसेचे आभार मानले आहेत.

पुणे येथील तालुका आंबेगाव येथे मंचर गावातील भीमाशंकर शेतकरी बचत गटाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागअध्यक्ष विजय शिंदे यांनी संपर्क केला.आपल्या मालाला आपल्या गावापेक्षा जास्त भाव मिळत असून मनसेच्या या पुढाकाराला प्रतिसाद देत डोंबिवलीत शेतकरी ते ग्राहक असा शेतकरी आठवडा बाजार सुरु केला. पश्चिमेकडील गरीबाचा वाडा येथील शुभांगान बिल्डींगजवळ दर मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ४ यावेळेत शेतकरी आठवडा बाजार भरविला जातो. यावेळी विजय शिंदे म्हणाले, डोंबिवलीतील गरीबाचा वाडा येथे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेच्या अंतर्गत आदर्श शेतकरी आठवडा बाजार सुरु झाला आहे. यासाठी माजी नगरसेवक तथा उपशहर अध्यक्ष माणिक म्हात्रे यांचे सहकार्य मिळाले. गावाच्या शुद्ध वातावरणातील ताज्या भाज्यांचा अनुभव याठिकाणी मिळणार आहे.शेतकरी गटाचा उत्पादित माल आल्या परिवाराच्या आरोग्यासाठी चांगल्या आहेत.नागरिकांना विनंती आहे कि, परप्रांतियांकडून भाजी विकत न घेता आपल्या शेतकऱ्यांकडून भाजी विकत घ्यावी. कारण त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या मालाची योग्य किमंत मिळते.तर शेतकरी – अरुण गांगाराम पोखरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले आहेत. पणन महामंडळाच्या अतर्गत कोरडवाहू उथान्न फार्मर प्रोडूसर कंपनी असून महामंडळ यांना आठवडा बाजारचे काम देतात. या कंपनीचे चेअरमन मंगेश भिसे यावेळी म्हणाले, या बाजाराला स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला पाहिजे. डोंबिवलीतील नागरिकांनी या शेतकऱ्यांकडून भाजी खरेदी केली पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळले. त्यांचे कर्ज फिटेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांच्यां आत्महत्या थांबतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!