बदलापूर नगरपरिषदेच्या जाहिरात ठेक्यात घोटाळा ?: उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली कारवाईची शिफारस, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष  !
बदलापूर/संतोष गायकवाड : कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या जाहिरात ठेक्यात नगरपरिषदेचा महसूल बुडवल्याचा ठपका उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या चौकशीत ठेवण्यात आला असून, उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची शिफारस केलीय. त्यामुळे बदलापूर नगर परिषदेचा जाहिरात घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी दोषींवर काय कारवाई करतात याकडं लक्ष वेधलंय.
नगरपरिषदेचे जाहिरात ठेक्यातील घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते विनायक जाधव हे गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनाबरोबर लढा देत आहेत.  बांधा- वापरा -हस्तांतरीत करा या तत्वावर नऊ वर्षासाठी हा ठेका देण्यात आलाय. एकूण ४० ठिकाणी कमानी उभारायचे असताना ठेकेदाराने अवघ्या ७ ठिकाणी उभारले अशी माहिती जाधव यांनी माहितीच्या अधिकारानव्ये उघडकीस आणली.
मात्र ठेकेदाराने करारातील अटींचा भंग केल्याने नगर परिषदेचे सुमारे ७ कोटीचे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप जाधव यांनी केला. उपविभागीय अधिकाऱयांनी सूनावण्या घेतल्यानंतर 1 मार्च रोजी हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली. विशेष म्हणजे हा ठराव सभागृहात करण्यात आलाय त्यामुळे अधिकारी हे नगरसेवकांकडे बोट दाखवत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांबरोबर नगरसेवकही गोत्यात सापडण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.  त्यामुळं जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
चौकशीत काय ठेवलाय ठपका …
१) निविदा प्रक्रियेत नगरपरिषदेच्या फायद्याचा विचार करण्यात आलेला नाही.
२) निविदेच्या करारानुसार ४० ठिकाणी व ठरावानुसार २८ ठिकाणी  स्वागत कमानी उभारणे आवश्यक होते. मात्र ठेकेदाराने ७  ठिकाणी  उभारल्याचे दिसून येते जे महसूल बुडविण्यास जबाबदार दिसून येते.  त्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी असे वाटते.
३) जाहिराती व कमानी इत्यादींचे कामकाज एक विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे हस्तांतरित करताना संचिका व दस्तऐवज हे नोंद न करताच देण्यात आले आहे. त्यामुळे ते गहाळ झाले आहेत. तत्कालीन मुख्याधिकारी यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासकीय कारवाईची शिफारस करण्यात आलीय.
One thought on “बदलापूर नगरपरिषदेच्या जाहिरात ठेक्यात घोटाळा ? : उपविभागीय अधिकाऱ्यांनी केली कारवाईची शिफारस, जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईकडे लक्ष  !”
  1. सिटीझन जर्नालिस्ट4 आपले मनःपूर्वक आभार! सदर प्रकरणी मी सुमारे दोन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहे.भ्रष्टाचार करणारे व त्याला दुर्लक्षित करणारे शासकीय यंत्रणेचे कर्मचारी अधिकारी,ज्यांच्यावर शहराचे,पालिकेचे विश्वस्थ म्हणून जबाबदारी आहे असे नगरसेवक, लोकशाहीचा चौथा खांब म्हणवले जाणारे वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यातील बऱ्याच मंडळींनी या गंभिर प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं.आपण राज्यस्तवर या गैरव्यवहाराला प्रकाशात आणलंत याबद्दल आपले आभार ! – विनायक जाधव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *