डोंबिवलीत होतेय हजारो लिटर पाणी गळती : एमआयडीसी अधिकारी लक्ष देतील का ?
डोंबिवली : एकीकडे पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने नागरिकांना पाणी कपातील सामोरे जावे लागत आहे. मात्र दुसरीकडे पाण्याच्या पाईपलाईन व्हॉल्व मधून पाण्याची गळती होऊन दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार घडलाय. पण याकडे एमआयडीसी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरीय.
डोंबिवली एमआयडीसी फेज 2, सोनारपाडा नाका जवळ पाईपलाईन व्हॉल्व मधून पाण्याची गळती सुरु आहे. गेल्या अनेक पासून ही गळती होत आहे. याकडे स्थानिक नागरिकांनी एमआयडीसीचे लक्ष वेधलं. मात्र याकडं एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.