लहानग्या ओम ने घेतला पुढाकार…तुम्ही ही घ्या !
डोंबिवली (शंकर जाधव) : जीवाची काहिली करणारा उन्हाळा सुरू झाल्याने माणसाप्रमाणे पशु- पक्षांची घालमेल झालीय. त्या मुक्या जीवांना पाणी मिळावे यासाठी डोंबिवलीतील ओम वायंगणकर या लहानग्याने पुढाकार घेत एक मातीच्या भांड्यात कृत्रिम पाणवठा तयार केलंय. आता त्या पाणवठ्यावर चिमण्यांचा थवा जमू लागलाय. हे पाहून ओम ही आनंदित झालाय. मात्र मुलाचे पक्षीप्रेम पाहून वडील संजीत वायंगणकर यांच्यासह इतरांनी त्याचे कौतुक केलय. तापमान वाढल्याने पक्षांसाठी कृत्रिम पाणवठ्याची गरज निर्माण झालीय.
पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ओमने पाण्याने भरलेलं मातीच भांड ठेवलंय. आता त्याठिकाणी पाणी पिण्यास चिमण्यांचा थवा जमू लागलाय. ओम दररोज सकाळी त्यात पाणी टाकतो. बालभवन शेजारी असलेल्या बडा साब या दुकानातून मोफत मातीचे पिण्याचे भांडे मिळते. ओमने या दुकानातून हे भांडे घेऊन पाण्याने भरून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे ठेवले. तापमान वाढलय आपल्याला खूप तहान लागते. आपण पाणी पिऊ शकतो, पण पक्षी कसे आणि कुठे पाणी पित असतील. यातून ही कल्पना सुचल्याचे ओम सांगतो. सर्वांंनी पाण्याने भरलेले भांड ठेवावे असे आवाहन त्याने केलंय.