संभाजी भिडेच्या अटकेसाठी सरकारला आठ दिवसाची मुदत, पुन्हा यायला लावू नका : प्रकाश आंबेडकरांचा इशारा
मुंबई : संभाजी भिडे याना तातडीने अटक करा, पुन्हा यायला लावू नका. पुन्हा आलो तर जे हवे ते मिळाल्याशिवाय जाणार नाही, त्यावेळी माझी दादागिरी चालेल असा निर्वाणीचा इशारा ऍड प्रकाश आंबेडकर यांनी एल्गार मार्चच्या समारोप प्रसंगी दिला.
कोरेगावं भीमा हिंसाचारमागील सूत्रधार असलेले संभाजी भुदे याब अटक करावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज एल्गार मोर्च्या काढण्यात आला होता. या मोर्च्यात दलित, मराठा आणि मुस्लिम समाज हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, भिडे यांना अटक करण्यासाठी सरकारला आठ दिवसाची मुदत दिलीय. कोरेगाव भीमा दंगलीस तीन महिने पूर्ण होत आहेत. पण आंदोलकांवर कारवाई झालेली नाही. नरेंद्र मोदी यांची फूस असल्यानेच भिडे गुरुजींना अटक होत नसल्याचा आरोप ऍड आंबेडकर यांनी केला.