भिडेना अटक झालीच पाहिजे : बाळासाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है : आझाद मैदान घोषणांनी दणाणले 

मुंबई : कोरेगाव- भिमा येथील हिंसाचारमागील मुख्य सूत्रधार असलेले मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांना अटक करण्याच्या मागणीसाठी राज्यातील आंबेडकरी अनुयांयानी आझाद मैदानात एल्गार आंदोलन सुरू केले आहे. या एल्गार मार्चमध्ये दलित समाजाबरोबरच मराठा, मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला आहे. भिडे ला अटक झालीच पाहिजे : बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है : आझाद मैदान घोषणांनी दणाणले.

मुंबई पोलिसांनी एल्गार  मोर्चाला परवानगी नाकारली असताना सुध्दा हजारो कार्यकर्ते भायखळा येथून एल्गार मार्च काढत आझाद मैदानाकडे पोहचले. सीएसटीहून जथ्थेच्या जथ्थे आझाद मैदानाकडे जात होते. या आंदोलनासाठी मुंबई शहर, उपनगरासह  अकोला, अमरावती, नागपूर, औरंगाबाद, जालना, नाशिक, इगतपुरी, जळगांव येथील आंदोलक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत.

संभाजी भिडे सरकारचे जावई आहेत का ? आंबेडकरांचा सवाल

भीमा कोरेगावं हिंसाचार प्रकरणात दोघीणविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील एक आरोपी मिलिंद एकबोटेल अटक केली. पण संभाजी भिडेला अजून अटक होत नाही. संभाजी भिडे हे सरकारचे जावई आहेत का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला. भिडे यांच्या अटकेसाठी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार मोर्चा काढण्यात आलाय. आंबेडकर हे आझाद मैदानात पोहचल्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हा सवाल केला.

.... तर मुख्यमंत्र्यांना अटक करा : संभाजी ब्रिगेड 

भारिप बहुजन महासंघाच्या या मोर्चाला संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे. दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ता श्रीमंत कोकाटे यांनी ‘संभाजी भिडे यांना अटक होत नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अटक करा’, अशी मागणी केलीय.

संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे एल्गार मोर्चात सहभागी झाले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले की,  भिडे यांना अटक न करण्यामागे षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे मुख्यमंत्र्यांचा हात असल्याच्या संशयाला वाव आहे. त्यामुळे संभाजी भिडेना अटक होत नसेल तर मुख्यमंत्र्यांना अटक करा असे कोकाटे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *