शिवसेनेची नौटंकी ; हिंमत असेल तर  मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवा :  विखे पाटील यांचे आव्हान 
मुंबई : अंगणवाडी सेविकांना लावलेला मेस्मा कायदा रद्द करावा अशी मागणी करीत असतानाच शिवसेनेचे आमदार चौगुले यांनी राजदंड पळवल्याचा प्रकार घडल्याने, सेनेच्या कृतीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही  शुद्ध नौटंकी आहे अशी तोफ डागलीय. हिंमत असेल तर सेनेने  मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा असे आव्हानही विखे पाटील यांनी दिलंय.
विधानसभा प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी सेनेचे पक्षप्रतोद सुनील प्रभू यांनी अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावण्याचा सरकारचा निर्णय रद्द करावा अशी मागणी केली होती. या मुद्द्यावर शिवसेनेसह कॉंग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारही आक्रमक झाले होते. आमदारांंनी  वेल मध्ये उतरून गोंधळ घातला. त्यावेळी शिवसेनेचे आमदार चौगुले यांनी राजदंड पळवल्याचा प्रकार घडला.  शिवसेना सरकारमध्ये सहभागी असल्याने त्यांनी या निर्णयाला अगोदर मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीव्र विरोध केला पाहिजे. शिवसेनेने मंत्रिमंडळात आपली भूमिका योग्यपणे पार पाडली तर कदाचित  सभागृहात आंदोलन करण्याची वेळच येणार नाही. सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचा घटक पक्ष असतानाही शिवसेनेला सरकारच्या एखाद्या भूमिकेविरोधात एवढी टोकाची भूमिका घ्यावी लागत असेल तर यातून त्यांची प्रामाणिकता नव्हे तर हतबलताच स्पष्ट होते, असेही विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!