मुंबईची लाईफ लाईन  प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यानी रोखली  

मुंबई : मुंबईची लाईफ लाईन समजली जाणारी लोकल सेवा आज माटुंगा दादर दरम्यान प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यानी रोखून धरली.त्यामुळे सीएसटी कडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमण्यांचे हाल झाले.
रेल्वे परीक्षा भरती गोंधळविरोधात विद्यार्थ्यानी हा रेलरोको केलाय.
विद्यार्थ्यानी आक्रमक पवित्रा घेत मोठ्या संख्येने रेल्वे रुळावर उतरले होते. त्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाली होती. लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस रखडल्या होत्याकाही प्रवासी रुळावर उतरून पायी चालत होते. तर विध्यार्थी रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत होते. पूर्वी अप्रेन्टिस विद्यार्थ्याना रेल्वे सेवेत सामावून घेतले जायचे. परंतु आता २० टक्के कोटा ठेवण्यात आलाय. तो कोटा रद्द करावा अशी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्याची मागणी आहे तसेच रेल्वेत अडीच लाख जागा रिक्त आहेत त्या भराव्यात अशीही मागणी विदयार्थ्यांनी केली. मात्र या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा विदयार्थ्यांनी दिलाय.
रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी उसळली

बेस्टच्या जादा गाड्या

माटुंगा येथे चालू असलेल्या आंदोलनामुळे मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाने डेपो मॅनेजर यांना जादा गाड्या चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत .
 असा झाला रेल रोको

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *