शेतकरी कुटुंबाच्या आत्महत्येची ३२ वर्षे…

 डोंबिवलीत दोन महिलेचे अन्नत्याग आंदोलन.

डोंबिवली ( शंकर जाधव ) : १९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ येथे एका शेतकऱ्याने परिस्थितीला कंटाळून कुटुंबासह आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेस ३२ वर्ष पूर्ण झाले असून अजूनही शेतकऱ्यांच्या हलाखीच्या परिस्थितीत फरक पडलेला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी सहवेदनेची जाणीव सरकारला करून देण्यासाठी डोंबिवलीतील दोन महिलांनी एक दिवशीय अन्नत्याग आंदोलन केले. मंजिरी खानोलकर आणि प्रमिला करुणाकर असे या दोन महिलांची नावे असूूून, डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात अन्नत्याग आंदोलन केले.

साहेबराव करपे आणि मालती करपे हे आपल्या कुटुंबासह यवतमाळ येथे राहत होते. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शेतीचे उत्पन्न बुडाल्याने कर्जाचा डोंगर डोक्यावर होता. दुसरीकडे सरकार शेतकऱ्याना मदत करण्यास कमी पडल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. अखेर परिस्थितीला कंटाळून करपे यांनी आपली पत्नी आणि चार मुलांसह आत्महत्या केली. या घटनेमुळे राज्यभर हळहळ व्यक्त केली होती. या दुर्दैवी घटनेला ३२ वर्ष पूर्ण झाली असूनही राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सत्र सुरूच आहे. या सहवेदना राज्य सरकारला कळाव्यात म्हणून डोंबिवलीतील मंजिरी खानोलकर आणि प्रमिला करुणाकर या दोन महिलांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात अन्नत्याग आंदोलन केले.याबाबत खानोलकर म्हणाल्या की, आज राज्यात सर्वत्र अन्नदान आंदोलन सूरु आहे. शेतकरी आत्महत्या करू नये. बळीराजा जगला पाहिजे  यासाठी सरकारने तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *