राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष, शहरअध्यक्ष पदाच्या उद्या निवडणूक
डोंबिवली :- राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कल्याण- डोंबिवली जिल्हा अध्यक्ष , विधानसभा अध्यक्ष कल्याण आणि डोंबिवली शहराध्यक्ष पदाची निवडणूक उद्या शनिवारी सायंकाळी ४ वाजता कल्याण येथील सुभाष मैदाना जवळील महिला मंडळ सभागृहात होणार आहे. या निवडणुकीत अनेक पदाधिकारी इच्छुक असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. बूथ, वॉर्ड, ब्लॉक, विधानसभा या पातळीवर प्रतिनिधी निवडले जातात. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार हे काम पाहणार आहेत.
रमेश हनुमंतेंना पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाची संधी ?
रमेश हनुमंतें हे जिल्हाध्यक्ष पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. जिल्हा अध्यक्ष पदाच्या तीन वर्षे कालावधीपैकी एक वर्ष हे पद रिक्त होते. त्यामुळे त्यांना अवघा दीड वर्षाचा कालावधी मिळाला. तसेच त्याकाळात अनेकजण पक्ष सोडून गेले त्यावेळी पक्षाची घडी विस्कटलेली होती त्यावेळी पक्षाची धुरा सांभाळली. मला जिल्हाध्यक्ष पदाचा कालावधी कमी मिळाल्याने पुन्हा संधी मिळावी अशी मागणी हनुमंतें यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलीय. त्यामुळे हमूनते याना पुन्हा संधी मिळणार का असाच प्रश्न निर्माण झालाय. कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली अश्या चार विधानसभा क्षेत्रात पदाधिकारी निवडले जाणार आहे.
डोंबिवलीत इच्छुकांची भाऊ गर्दी !
डोंबिवली विधानसभेत तीन ब्लॉक आहेत. त्यापैकी डोंबिवली पूर्वत एक आणि पश्चिमेत दोन ब्लॉक आहेत. एकूण १८ जणांमधून डोंबिवली शहर अध्यक्ष निवडला जाणार आहे. शहराध्यक्ष पदासाठी राजेंद्र नांदोस्कर, सुरेंद्र म्हात्रे, राजू शिंदे आणि भाऊ पाटील यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे शहर अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते याकडं लक्ष वेधलय.
असा निवडला जाईल जिल्हाध्यक्ष
ब्लॉकमधील प्रतिनिधी विधानसभेवर आणि विधानसभेवरील प्रतिनिधी जिल्हयावर निवडले जातात. प्रत्येक विधानसभेवर ६ प्रतिनिधी असे ४ विधानसभेतील २४ प्रतिनिधी जिल्ह्यावर जातील व त्यातून जिल्हाध्यक्ष निवडला जाईल. तसेच प्रत्येक विधानसभेतून एक प्रदेश प्रतिनिधी निवडला जाणार आहे.