अंगणवाडी सेविकांचा संप मागे : सेवाज्येष्ठतेनुसार मिळणार मानधन वाढ
मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांनी संप मागे घेतला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाज्येष्ठतेनुसार त्यांना मानधन देण्याची घोषणा केल्याने संप मागे घेतला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नुकतीच मानधन वाढ जाहीर करण्यात आली आहे. त्यासाठी ३११ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. आता सेवाज्येष्ठतेनुसार मानधन तत्वामुळे त्यात अजून ४० कोटी रुपयांची भर पडेल. अशी एकूण ३५१ कोटी रुपयांची ही मानधन वाढ असेल, असेही मुख्यमं त्रयांनी स्पष्ट केलं
मुख्यमंत्री फडणवीस यांची शुक्रवारी विविध अंगणवाडी संघटनांच्या प्रतिनिधीशी बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्रयानी हा निर्णय घेतला. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, सेविकांसाठी नुकतीच जाहीर केलेली 1500 रुपयांची मानधन वाढ ही त्यांच्या एकूण मानधनाच्या 30 टक्के इतकी आहे. आता मुख्यमंत्र्यांनी सेवाज्येष्ठतेनुसार मानधनाच्या तत्वास मान्यता दिल्याने त्या मानधनात अजून वाढ होणार आहे. पुढील आर्थिक वर्षापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अजून 5 टक्के मानधन वाढ देण्यासही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे.