एकदा सरकार माझ्या हातात दया, मग बघा : राज ठाकरे
राज ठाकरेनी घेतली शेतकऱ्यांची भेट
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानावर जाऊन मोर्चेकरी शेतकऱ्यांची भेट घेतली. इतक्या लांबून तुम्ही आलात तुमचे स्वागत करावे दर्शन घ्यावे म्हणून मी आलोय. थापाड्या सरकारकडून अपेक्षा करू नका. आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्ता दिली, भाजप-शिवसेनेला सत्ता दिली, पण शब्द पाळला नाही. तुम्हाला सगळ्यांनी फसवलं. एकदा हे सरकार राज ठाकरेच्या हातात देऊन पाहा, मग मी तुमच्या मागण्या कश्या पूर्ण अर्धवट ते बघा ,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
तुम्ही एवढ्या लांबून चालत येत असताना तुमच्या पायात आलेलं रक्त हे विसरू नका. तुमचा राग कायम ठेवा असंही राज ठाकरे म्हणाले. तुम्हाला वेगवेगळी स्वप्न दाखवली गेली, शब्द दिले गेले. सत्ता आल्यानंतर हे करू असे जाहीरनाम्यात सांगितलं गेलं, पण काहीच झालं नाही. शेतकऱ्यांची किंमत ही केवळ मतापुरतीच केली जाते,” असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला. तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात, कोणत्या झेंड्याखाली चालत आला आहात याचं घेणंदेणं नाही, फक्त शेतकरी महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांसाठी शक्य ते करण्यासाठी पक्ष म्हणून सैदव पाठीशी आहोत. ज्या वेळी हाक माराल, त्यावेळी राज ठाकरेकडून ओ येईल,” अशी ग्वाही राज ठाकरेंनी शेतकऱ्यांंना दिली.