कल्याण डोंबिवलीतील सिमेंट रस्त्याची सरकारकडून पाहणी करणार  :  डॉ. रणजित पाटील यांचे आश्वासन 
मुंबई : कल्याण डोंबिवलीतील सिमेंट रस्त्यांची राज्य सरकारकडून पाहणी करण्यात येईल असे आश्वासन नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जगन्नाथ(आप्पा) शिंदे यांनी विधान परिषदेत ९३ अनव्ये सूचना मांडून हा प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी उत्तर हे दिशाभूल करणार असल्याचे आमदार शिंदे यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नगरविकास राज्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं.
कल्याण डोंबिवलीतील सिमेंट रस्त्याची दुरावस्था, रस्ते कामातील दिरंगाई , अर्धवट कामांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य  आणि  यामुळे खोकला  आणि घशाच्या आजाराने त्रस्त असलेले
नागरिक यासंदर्भातील प्रश्न विचारला होता. मात्र केडीएमसीतील अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामात कोणतीही दिरंगाई नसल्याचे लेखी उत्तरात म्हंटले आहे. तसेच सिमेंट रस्त्याच्या कामासाठी रेडिमिक्स काँक्रिटचा वापर होत असल्याने धुळीचा प्रश्न उदभवत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलंय. मात्र महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर हे दिशाभूल करणारे असल्याचा मुद्दा यावेळी आमदार शिंदे यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला.  तसेच रस्त्याच्या अर्धवट कामामुळे मागील महिन्यात आयुक्तांच्या बंगल्यासमोर एका शाळकरी मुलाला जीव गमवावा लागलाय. धुळीच्या त्रासामुळे खोकला आदी आजारांचा सामना करावा लागत असल्याची बाबही आमदार शिंदे यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी  नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी कल्याण डोंबिवलीतील सिमेंट रस्त्याची राज्य सरकारकडून पाहणी करण्यात येईल असे स्पष्ट केलं.  यावेळी सभापतींनी बैठक लावण्याचेही निर्देश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!