मुंबईत २९ लाख ७५ हजार झाडांची गणना.. .बसंत रानीने वेधलय मुंबईकरांच लक्ष

मुंबई : महापालिका क्षेत्रात नुकत्याच झालेल्या वृक्षगणनेनुसार एकूण २९ लाख ७५ हजार २८३ एवढे वृक्ष आहेत. यामध्येच ६ हजार ५८० ‘बसंत रानी’ वृक्षांचा समावेश आहे. मात्र पूर्व द्रुतगतीमार्गावरील बहरलेल्या बसंत रानीने वृक्षाने संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष वेधलय. हिंदी भाषेत ‘बसंत रानी’ अशी ओळख असणा-या या झाडाचे वनस्पतीय शास्त्रीय नाव ‘टॅब्यूबिया पेंटाफायला’ असे आहे. तर इंग्रजीमध्ये ‘पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा’ या नावांनीही ओळखले जाते .

महापालिका क्षेत्रातील पूर्व द्रुतगती मार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी या भागात व विशेष करुन मार्गाच्या मध्यभागी असणा-या दुभाजकावर पर्यावरणाच्या व सुशोभिकरणाच्या दृष्टीकोनातून विविध झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांमध्ये ‘बसंत रानी’ या प्रकारच्या झाडांचाही समावेश आहे. सुमारे २५ ते ३० फुट उंच असणा-या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षी देखील फुलांनी बहरलेली ‘बसंत रानी’ ची झाडे नागरिकांचे व पुष्पप्रेमींचे लक्ष वेधून घेतलय. या झाडांना पाणी देणे व वेळोवेळी आवश्यक ते परिरक्षण करण्याची कामे महापालिकेच्याच उद्यान खात्याद्वारे नियमितपणे केली जात असतात, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली आहे. महापालिका क्षेत्रातील पर्यावरणाचे संवर्धन होण्यासोबतच सुशोभिकरणही साधले जावे, या दृष्टीने महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे वृक्षारोपण व वृक्ष जोपासना नियमितपणे केली जात असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!