नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करणा-या  १९  संस्थाचा  सन्मान 

जनहित प्रतिष्ठानतर्फे कौतूक सोहळा संपन्न 

डोंबिवली : नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करणा-या सेवाभावी संस्थाचा कार्याची दखल घेऊन जनहित प्रतिष्ठानच्यावतीने सेवाभावी संस्थांचा कौतूक सोहळा नुकताच पार पडला. डोंबिवलीचे एसीपी रविंद्र वाडेकर नगरसेवक राजन आभाळे निलेश म्हात्रे जनहित प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश काळे आदींच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील सुमारे १९ सामाजिक संस्थांना सन्मान पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
डोंबिवलीतील आधार इंडिया, शिवनलिनी संस्था, ओमकार कर्णबधीर, सारथी संस्था सातारा, पसायदान बाल विकास संस्था, क्षितीज संस्था अशा १९ संस्थाचा सत्कार एसीपी वाडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी एसीपी वाडेकर यांनी पसायदान बालविकास संस्थेला १० हजार रूपयांची आर्थिक मदत जाहिर केली. रेल्वे स्टेशनवर व रस्त्यावर बेवारसपणे फिरणा-या मुलांना सांभाळण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते.

One thought on “नि:स्वार्थपणे समाजाची सेवा करणा-या १९ संस्थाचा सन्मान”
  1. खुप छान व स्तुत्य ऊपक्रम. शुभेच्छा…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!