कल्याणातील सुप्रसिध्द बिल्डर आसिफ झोजवाला यांची आत्महत्या 

कल्याण : कल्याणातील प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक आसिफ झोजवाला यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री उघडकीस आलीय.  झोजवाला यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. त्यामुळे झोजवाला यांच्या आत्महत्येचे गुढ वाढलय.

कल्याण पश्चिमेतील कल्याण-मुरबाड रोडवर ‘राणी मॅन्शन’मध्ये आसिफ झोजवाला राहत होते. झोजवाला हे भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी होते.  याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात नेांद करण्यात आलीय. काही दिवसांपूर्वीच केडीएमसीने ओपन लॅण्ड टॅक्स थकबाकी प्रकरणी झोजवाला यांची मालमत्ता सील केली होती. त्यामुळेही झोजवाला हे  अस्वस्थ होते अशीही  माहिती पोलीस सुत्रांकडून सांगितली जातेय.

 

One thought on “कल्याणातील सुप्रसिध्द बिल्डर आसिफ झोजवाला यांची आत्महत्या ”
  1. Rest In piece Asifbhai. This due to un lawfull system of KDMC no plans are getting pass no TDR are getting load so un resonable open land tax huge amount of courption how a Developrs wud survive .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *